IND vs SA 3rd T20I: सामना जिंकल्यानंतरही कर्णधार ऋषभ पंत नाराज

या वर्षातील कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा पहिला विजय
IND vs SA 3rd T20I
IND vs SA 3rd T20I

India vs South Africa: भारतीय संघाने तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम खेळ दाखवला. सामना संपल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत खूप आनंदी दिसला नाही. त्याने अनेक खेळाडूंचे जोरदार कौतुक केले. भारताचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, मला वाटत की आम्ही फलंदाजीत 15 धावांनी मागे राहिलो पण गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या वर्षातील कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा पहिला विजय आहे. या विजयानंतर भारताने मालिका जिंकण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या पराभवानंतरही दक्षिण आफ्रिका मालिकेत 2-1 ने पुढे आहे.

IND vs SA 3rd T20I
IND vs SA : गायकवाड - पटेलने भारताचे मालिकेतील आव्हान ठेवले जिवंत

भारतीय कर्णधार ऋषभ पंत म्हणाला, ही चांगली कामगिरी नाही, आम्हाला चांगली सुरुवात मिळाल्यानंतर नवीन फलंदाज येताच वेगवान खेळ करणे कठीण जाते. पुढील सामन्यात आम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आम्ही फलंदाजी करताना आणखी 15 धावा करायला हव्या होत्या. गोलंदाजांनी त्यांचे काम चोख बजावले. गोलंदाजांनी पण चांगली गोलंदाजी केली. या सामन्यात युझवेंद्र चहलने तीन आणि हर्षल पटेलने चार विकेट घेतल्या आहे.

IND vs SA 3rd T20I
Neeraj Chopra New Record: टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रम काढला मोडीत

भारतीय संघाने या मालिकेत प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारतीय संघाने तिसरा T20 सामना 48 धावांनी जिंकला. भारतासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. ईशान किशन आणि रुतुराज गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला. या सामन्यात दोघांनी झंझावाती अर्धशतके केली. त्यांच्यामुळेच भारतीय संघ 179 धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि संपूर्ण संघ 131 धावांत ऑलआऊट झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com