खराब फॉर्मनंतर ऋषभ पंतचा टी-20 World Cup मधून पत्ता कट?

ऋषभ पंतला टी-20 विश्वचषकात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण
Rishabh Pant
Rishabh Pantesakal

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. बंगळुरूमध्ये झालेला शेवटचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे सोपवण्यात आले होते. संघाची कामगिरी चांगली होती, पण पंतला फलंदाजीत काही चांगली कामगिरी करता आली नाही. संपूर्ण मालिकेत चाहत्यांची नजर कर्णधार ऋषभ पंतकडे होती, पण फलंदाजीत तो विशेष काही करू शकला नाही. पंतला 5 डावात केवळ 58 धावा करता आल्या. त्यामुळे त्यांच्या जागेवर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

Rishabh Pant
रोहित आणि कार्तिकचे जुनं चॅट व्हायरल, जेव्हा हिटमॅनने कार्तिकला...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेने दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याला टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळण्याचा मार्ग त्याने मोकळा केला आहे, तर कर्णधार ऋषभ पंतची निवड धोक्यात आहे. मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये पंतने फलंदाजी करत 29, 5, 6 आणि 17 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत टी-20 विश्वचषक स्पर्धेत पंतचे स्थान धोक्यात आले आहे.

ऋषभ पंतला टी-20 विश्वचषकात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण जाणार आहे. दिनेश कार्तिक नि:संशय प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार आहे. केएल राहुल तंदुरुस्त होताच संघात पुनरागमन करेल. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हे 3-4 खेळाडू संघात असतील असे वाटत आहे. त्यामुळे ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल.

Rishabh Pant
सेल्फीसाठी आलेल्या ग्राउंड्समन सोबत ऋतुराजचं वागणं नेटकऱ्यांना खटकलं, Video व्हायरल

भारतीय टी-20 संघात फिनिशर म्हणून खेळणाऱ्या ऋषभ पंतने आतापर्यंत 47 सामने खेळले आहे. फिनिशरने आत येऊन झटपट धावा केल्या पाहिजेत, पण पंतचे आकडे वेगळेच काही तरी सांगत आहे. पंतने भारतासाठी 41 टी-20 सामन्यामध्ये केवळ 124 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. भारतासाठी 14 फलंदाजांनी टी-20 मध्ये 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ज्यामध्ये फक्त गौतम गंभीरचा स्ट्राइक रेट पंतपेक्षा कमी आहे. या कारणास्तव, पंत लवकर फॉर्ममध्ये आला नाही, तर संघात त्याचे स्थान घेण्याचे अनेक दावेदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com