रेहित शर्माचा धडाका, भारताच्या 167 धावा 

India vs West Indies 2nd T20 India 167 for 5
India vs West Indies 2nd T20 India 167 for 5

लॉडरगील (फ्लोरिडा) - सलामीचा फलंदाज रोहित शर्माच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजसमोर रविवारी 168 धावांचे आव्हान ठेवले. भारताने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 167 धावा केल्या. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यावर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला तुफानी सुरवात करून दिली. पहिल्या सामन्यात शनिवारी भारतीय फलंदाजांची 96 धावांचा पाठलाग करताना दमछाक झाली होती. मात्र, आज प्रथम फलंदाजी घेतल्यावर भारतीय फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. रोहित, शिखर यांची सुरवातच विंडीज गोलंदाजांचे खच्चीकरण करणारी होती. त्यांनी 8 षटकांतच 67 धावांची सलामी दिली. त्यावेळी भारताला शिखरची विकेट गमवावी लागली. 

त्यानंतर रोहितने आपला धडाका कायम ठेवताना टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर करत शानदार अर्धशतक झळकावले. रोहित 51 चेंडूंत 6 चौकार, 3 षटकारांसह 67 धावांची खेळी करून बाद झाला. रिषभ पंत पुन्हा एकदा संधीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला. मनीष पांडे देखील टिकू शकला नाही. कर्णधार कोहली गियर बदलणार असे वाटत असतानाच बाद झाला. अशा वेळी कृणाल पंड्याने 13 चेंडूंत दोन षटकारासंह 20 धावांचा दणका देत भारताचे आव्हान उभे केले. 

संक्षिप्त धावफलक - भारत 20 षटकांत 5 बाद 167 (रोहित शर्णा 67 -51 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, शिखर धवन 23, विराट कोहली 28, कृणाल पंड्या नाबाद 20, ओशान थॉमस 2-27, शेल्डन कॉट्रेल 2-25)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com