IND vs WI : पाचव्या टी-20 सामन्यासाठी हार्दीक पांड्या कर्णधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian captain Hardik Pandya

IND vs WI : पाचव्या टी-20 सामन्यासाठी हार्दीक पांड्या कर्णधार

IND vs WI 5th T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील अंतिम सामना आज फ्लोरिडा यूएसए येथे खेळला जात आहे. आजच्या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

रोहित व्यतिरिक्त भारतीय संघाने या सामन्यासाठी ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव यांना विश्रांती दिली असून इशान किशन, कुलदीप यादव, पंड्या आणि श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले आहेत. वेस्ट इंडिज संघाने चार बदल केले आणि शामराह ब्रूक्स, हेडन वॉल्श, ओडिन स्मिथ आणि कीमो पॉल यांचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये केला. पाच सामन्यांच्या मालिका भारताने याआधीच 3-1जिंकली आहे. त्यामुळे मालिका आधीच भारताच्या खिशात आहे.

  • भारतीय संघ - ईशान किश, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दीक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, आवेश खान, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आणि अर्शदीप सिंह

  • वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डॉमनिक ड्रेक्स, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.

Web Title: India Vs West Indies 5th T20i Indian Captain Hardik Pandya Rohit Sharma Has Been Rested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..