T20 World Cup 2020 : गिलख्रिस्ट म्हणतो बघा हाच संघ असेल विश्‍वविजेता

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍडम गिलख्रिस्ट याने पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला संभाव्य विजेते म्हणून पसंती दिली आहे. 

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍडम गिलख्रिस्ट याने पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला संभाव्य विजेते म्हणून पसंती दिली आहे. 

INDvsBAN : आम्ही बेकार नाही बसलोय; दुसरा सामना पण जिंकतो का नाही बघा

टी 20 क्रिकेट म्हणजे निव्वळ लॉटरी आहे. लागली तर चांदी नाही, तर काहीच नाही असे या क्रिकेटचे स्वरुप आहे, असेही गिलख्रिस्ट म्हणाला. 
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत यजमानऑस्ट्रेलियासह इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ विजेतेपदाच्या आघाडीवर असले, तरी यांना भारतीय संघाचे तगडे आव्हान असेल, असेही त्याने स्पष्ट केले. 

टी 20 क्रिकेट ही लॉटरी आहे. कोण जिंकेल हे सांगता येत नाही, असे सांगून गिलख्रिस्ट म्हणाला,""विजेतेपद कोण पटकाविणार हे सांगणे कठिण आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चार संघ आघाडीवर असतील. पण, पसंती द्यायचीच झाली, तर मी भारताला देईन.'' 

INDvsBAN : टीम इंडियासमोर चक्रव्यूह; चक्रीवादळ आणि मालिका गमावण्याची भिती 

टी 20 क्रिकेटमध्ये सध्या पाकिस्तान क्रमवारीत अव्वल आहे. त्यांनाही कमी लेखून चालणार नाही, असे गिलख्रिस्टचे म्हणणे पडले. शेवटी हा खेळ आहे. सामन्याच्या दिवशी ज्याचा खेळ चांगला होतो, तो संघ जिंकतो. त्यामुळे सर्व संघांना समान संधी असे म्हटले तर चूक ठरू नये, असेही त्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India will win the T20 world cup says Adam Gilchrist