WT20 WC 23: मंधानाच्या वादळानंतर पावसाचा तांडव! भारत उपांत्य फेरीत, पाकिस्तान बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WT20 WC 23: मंधानाच्या वादळानंतर पावसाचा तांडव! भारत उपांत्य फेरीत, पाकिस्तान बाहेर

WT20 WC 23: मंधानाच्या वादळानंतर पावसाचा तांडव! भारत उपांत्य फेरीत, पाकिस्तान बाहेर

IND vs IRE Women’s T20 World Cup 2023: भारताने दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सोमवारी पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा पराभव केला.

भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने ग्रुप-बी मधील शेवटच्या सामन्यात आयर्लंडचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तान बाहेर गेला आहे. ब गटातून आधीच इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. स्मृती मंधानाचे शतक हुकले. तिने 56 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 87 धावा करून ती बाद झाली. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 155 धावा केल्या. मंधाना व्यतिरिक्त इतर कोणताही भारतीय फलंदाज विशेष काही करू शकला नाही. मंधानाने शेफालीसोबत सलामीच्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. शेफाली 29 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 24 धावा करून बाद झाली.

यानंतर मंधानाने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. आयर्लंडचा कर्णधार एल डेलानीने 16व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत हरमनप्रीत आणि ऋचा घोष यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हरमन 13 धावा करून तर रिचाला खातेही उघडता आले नाही. यानंतर मंधानाने षटकारांसह टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक झळकावले. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले.

त्यानंतर भारताला पुन्हा 19 व्या षटकात दोन धक्के बसले. 19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर गॅबी लुईसने स्मृती मानधनाला तर पुढच्याच चेंडूवर दीप्ती शर्माला झेलबाद केले. दीप्तीला खाते उघडता आले नाही. डावाच्या शेवटच्या चेंडूवर जेमिमा रॉड्रिग्सही बाद झाली. तिला 12 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 19 धावा करता आल्या. डेलानीने तीन आणि प्रेंडरगास्टने दोन गडी बाद केले. आर्लेन केलीला एक विकेट मिळाली.

प्रत्युत्तर आयर्लंड संघाची सुरूवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकातच दोन धक्के बसले. अॅमी हंटर डावाच्या पहिल्याच चेंडूवर धावबाद झाली. दोन धावा काढण्याच्या नादात हंटरने आपली विकेट गमावली. तिला एक धाव काढता आली. यानंतर रेणुकी सिंगने पाचव्या चेंडूवर प्रेंडरगास्टला क्लीन बोल्ड केले. तिला खातेही उघडता आले नाही.

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर आयर्लंडने चांगलीच उसळी घेतली. पावसामुळे सामना थांबवला तेव्हा आयर्लंडने 8.2 षटकांत दोन गडी गमावून 54 धावा केल्या होत्या. कर्णधार एल डेलेनी 32 आणि गॅबी लुईस 17 धावा करून खेळत होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने हा सामना पाच धावांनी जिंकला. भारताकडून सर्वाधिक दोन विकेट रेणुका सिंगने घेतले. तिच्या व्यतिरिक्त कोणालाही विकेट घेतली नाही.