सर्बिया बॉक्‍सिंगमध्ये भारतास चार सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

भारताच्या कुमार बॉक्‍सिंग संघाने सर्बिया नेशन कप कुमार स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह 12 पदके जिंकली. भारत या स्पर्धेत पदक क्रमवारीत दुसरा आला.

मुंबई ः भारताच्या कुमार बॉक्‍सिंग संघाने सर्बिया नेशन कप कुमार स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह 12 पदके जिंकली. भारत या स्पर्धेत पदक क्रमवारीत दुसरा आला.

तमन्ना (48 किलो), अम्बेशोरी देवी (57 किलो), प्रीती दहिया (60 किलो) आणि प्रियांका (55 किलो) यांनी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या सिमरन वर्मा हिला 52 किलो गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या व्हॅलेनिया लिंकोवा हिच्याविरुद्ध 0-5 अशी हार पत्करावी लागली. गोव्याच्या आश्रेया नाईकने 63 किलो गटात ब्रॉंझ जिंकले.

या स्पर्धेत 20 देशातील 160 बॉक्‍सरचा सहभाग होता. भारताच्या 13 बॉक्‍सरच्या संघाने 12 पदके जिंकली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india won four gold in serbia boxing