World Cup 2019 : विराटला दुखापत; पहिल्या सामन्यापूर्वीच भारताला धक्का

वृत्तसंस्था
रविवार, 2 जून 2019

केदार जाधव अजूनही दुखापतीतून सावरत असताना कोहलीला झालेली दुखापत म्हणजे भारतासाठी मोठी चिंतेची बाब आहे. त्याच्या दुखापतीबद्दल अद्याप कोणताही खुलासा संघ व्यवस्थापनातर्फे करण्यात आलेला नाही. 

वर्ल्ड कप 2019 : साउथॅम्पटन : भारतीय संघ पाच जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वकरंडकातील आपला पहिला सामना खेळणार असल्याने सर्वच खेळाडू कसून सराव करत आहेत. मात्र, अशातच भारताला एक मोठा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. 

काल (ता.1) झालेल्या सराव सत्रात कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली. कोहलीला दुखापत होताच संघाचे फिजिओ पॅट्रीक फरहार्ट यांनी त्याला स्प्रे मारुन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर कोहली सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला. 

केदार जाधव अजूनही दुखापतीतून सावरत असताना कोहलीला झालेली दुखापत म्हणजे भारतासाठी मोठी चिंतेची बाब आहे. त्याच्या दुखापतीबद्दल अद्याप कोणताही खुलासा संघ व्यवस्थापनातर्फे करण्यात आलेला नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian captain Virat Kohli injured his right thumb during training in World Cup 2019