ग्रॅण्डमास्टर सौम्याचा हिजाब घालण्यास नकार, एशियन चॅम्पिअनशिपमधून माघार

saumya-swaminathan
saumya-swaminathan

पुणे -  भारताची महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पिअन सौम्या स्वामीनाथनने इराणमध्ये होणाऱ्या एशियन टीम चेस चॅम्पिअन शिपमधून माघार घेतली. २६ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान एशियन इराणमध्ये चॅम्पिअनशिप पार पडणार आहे. परंतु, इराणमध्ये महिलांना हिजाब घालणे अनिवार्य आहे. परंतु, असे करण्याने आपल्या वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन होणार असून, यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे तिने फेसबुकवर म्हटले आहे. 

''माझ्यावर हिजाब घालण्याची जबरदस्ती व्हावी अशी माझी इच्छा नाही. मला वाटते हिजाब घालण्याचा इराणचा कायदा माझ्या मानवी अधिकारांचे उल्लंघन आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचारांचे स्वातंत्र्य आणि धर्माचेही उल्लंघन आहे. अशा परिस्थितीत माझ्या हक्कांची सुरक्षा करण्यासाठी माझ्यासमोर एकच मार्ग आहे तो म्हणजे मी इराणला जाऊ नये'' असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, या स्पर्धेत सहभागी होता येत नसल्याचे आपल्याला दु:ख आहे. असेही तिने म्हटले आहे. खेळासाठी वैय्यक्तिक आयुष्यात आपण अनेक तडजोडी करत असतो. परंतु, काही गोष्टी अशा असतात ज्यांच्यासोबत तडजोडी केल्या जाऊ शकत नसल्याचेही तिने म्हटले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com