बोनस न मिळाल्याने 'रवी शास्त्रीं'चा रेल्वेतून प्रवास

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिवाळी बोनस न दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करत आहेत, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामागचे कारण डुप्लिकेट रवी शास्त्रींच्या लोकलमधील व्हिडिओमुळे सध्या ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

रवी शास्त्री यांच्यासारखी दिसणारा एक व्यक्ती मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत होता. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी रवी शास्त्री यांना ट्रोल केले आहे. संबंधित व्यक्तीचा व रवी शास्त्री यांचा चेहरा मिळता जुळता आहे. यापूर्वी रवी शास्त्रींना वाढलेल्या पोटामुळे ट्रोल केले होते. आता त्यांच्या डुप्लिकेट चेहऱ्यामुळे ते पुन्हा चर्चेत आहेत.

रवी शास्त्री यांचे डुप्लिकेटचा छायाचित्र शेअर करताना नेटीझन्स म्हणतात, 'बीसीसीआयने दिवाळी बोनस दिला नाही, यामुळे रवी शास्त्री जनरल डब्ब्यात प्रवास करत आहेत. विराट कोहली टीममध्ये नसताना रवी शास्त्रींची झालेली अवस्था. विराट कोहलीने रवी शास्त्रींना पार्टीचे आमंत्रण न दिल्याने ते नाराज आहेत. 2019 क्रिकेट विश्वचषकानंतर रवी शास्त्रींची अवस्था अशी होईल.' अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळतात.

Web Title: indian coach ravi shastris trolls on social media