आयपीएल लिलाव होण्यापूर्वी द्रविडने दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाला...

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

द्रविड म्हणाला, आपल्या देशात क्रिकेटपटूंप्रमाणेच चांगले प्रशिक्षक आहेत. आणि त्यांच्या प्रतिभेचा उपयोग करण्याची गरज आहे.

आयपीएलला अजून चार महिने वेळ असला तरी त्याविषयीच्या चर्चा आतापासूनच सुरू झाल्या आहेत. त्याच्या आगामी लिलाव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुढील महिन्यात आयपीएलचा लिलाव होणार आहे. मात्र, भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष 'द वॉल' राहुल द्रविडने याबाबत नाराजी दर्शवली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

द्रविडची नाराजी भारतीय प्रशिक्षकांबाबतची आहे. आयपीएलमधील संघ हे भारतीय प्रशिक्षकांना संधी देत नसल्याचे द्रविडचे म्हणने आहे. द्रविड लखनऊमध्ये सुरू असलेल्या भारत-अफगाणिस्तान अंडर-19 चा सामना पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने आपले मत व्यक्त केले. 

द्रविड म्हणाला, आपल्या देशात क्रिकेटपटूंप्रमाणेच चांगले प्रशिक्षक आहेत. आणि त्यांच्या प्रतिभेचा उपयोग करण्याची गरज आहे. मात्र, त्यांना आपल्या देशात होणाऱ्या आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत आपले कौशल्य आजमावण्याची संधी मिळत नाही. संघमालकही भारतीय प्रशिक्षकांना संधी देत नाहीत. मात्र, आता त्यांच्यावर विश्वास दाखवणे गरजेचे आहे, असे मला वाटते. 

तो पुढे म्हणाला, भारतीय प्रशिक्षकांबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही की, ते भारतीय खेळाडूंना चांगले ओळखतात. तसेच सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिकादेखील ते चांगली सांभाळतात. त्यांच्याकडील या गोष्टींचा विकास करण्यासाठी त्यांना अगोदर संधी मिळणे गरजेचे आहे. 

दरम्यान, 19 डिसेंबरला आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव होणार आहे. तसेच अनेक संघमालकांनी त्यांच्या खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. यामुळेच आपला आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघातून खेळणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian coaches not getting enough opportunities in IPL says Rahul Dravid