आधी DRS सुधारा मग विराटला दंड करा

शैलेश नागवेकर
रविवार, 23 जून 2019

29व्या षटकात अफगाणिस्तानच्या आणखी एका फलंजाविरुद्ध पायचीतचे अपिल झाले. DRS नसल्यामुळे विराट हतबल होता त्यामुळे तो जोरजोरात अपिल करत होता त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई झाली.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धचा अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना भारताला जिंकला त्यामुळे एक संकट टळले पण कर्णधार विराट कोहलीच्या मानधनातील 25 टक्के रक्कम कापण्याचा निर्णय आसीसीसीने घेतला. पंच अलिम दार यांच्याकडे फारच आक्रमकपणे अपिल केल्याचा आरोप विराटवर ठेवण्यात आला. मुळात विराटचा स्वभाव आक्रमक आहे त्याने ही कृती केली हे सुद्धा मान्य पण त्यासही कारण आहे. हे समजून घेणे महत्वाचे आहे. 

हे सगळे DRS मुळे घडले. DRS म्हणजे पंचांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपिल करण्याची संधी. मुळात DRS समजून घ्यायला हवे. यामध्ये तीन प्रकार असतात 

1) बॅटला चेंडू लागला आहे का
2) हॉट स्पॉट
3) बॉल ट्रॅकिंग (चेंडूचा टप्पा पडल्यावर तो कोणत्या दिशेला जाणार)

आयसीसीने ही प्रणाली लागू केली तिची अंमलबजावणीही सुरु झाली तरी बीसीसीआयचा त्याला विरोध होता. सचिन तेंडुलकर त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांचा प्रामुख्याने विरोध केला होता त्यामुळे भारतीय संघ ज्या ज्या द्विपक्षीय मालिकेत खेळायचा त्या त्या मालिकेत DRS नसायचे. पुढे भारतीयांनी काही बदल सुचवले. भारतीयांचा या प्रणालीला विरोध नव्हता. तर त्यातील हॉट स्पॉट आणि बॉल ट्रॅकिंग या प्रकाराला होता कारण ही प्रणाली ऑस्ट्रेलियातील कुकाबुरा कंपनी तयार करते. या प्रणातील दोष असल्याचे भारतीयांचे म्हणणे आहे. कारण चेंडू पडल्यावर तो नेमका ठराविकच पद्धतीनेच स्विंग किंवा स्पिन होईल हे ती प्रणाली नेमकच्या पद्धतीने कसे दर्शवले. किंवा कधी कधी चेंडू फुटमार्कमध्ये पडला की अचानक वळतो उडते ते फुटमार्क या प्रमाणीला कसे समजणार...असे अनेक मुद्दे असल्याने भारतीयांचा त्याला विरोध आहे.

पण आयसीसीच्या स्पर्धेत आयसीसीचे सर्व नियम लागू होतात. आता अफगाणिस्तानच्या सामन्यात काय झाले ते पाहूया

जसप्रित बुमराचा एक चेंडू अफगाणिस्तान फलंदाजाच्या पॅडला लागला त्यावेळी त्याचा पाय यष्टींच्या मध्ये होता, परंतु  दार यांनी नाबादचा निर्णय दिला. भारतीयांनी DRS घेतला पण बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू यष्टींच्यासमोर जी पट्टी दाखवण्यात एते त्या पट्टीच्या अर्धा बाहेर आणि अर्धा आत चेंडू होता. खरे तर टप्पा कोठे पडलाय हे महत्वाचे नाही चेंडूंचा इम्पॅक्ट म्हणजे चेंडू पॅडला कोठे लागला हे महत्वाचे आहे. DRS भारताच्या विरोधात तर गेलाच पण चेंडू अर्धा बाहेर असल्यामुळे रिव्हयूही गेला. त्यावेळी विराट दार यांच्याशी सतत विचारणा करत होता. 

29व्या षटकात अफगाणिस्तानच्या आणखी एका फलंजाविरुद्ध पायचीतचे अपिल झाले. DRS नसल्यामुळे विराट हतबल होता त्यामुळे तो जोरजोरात अपिल करत होता त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई झाली.

विराटने चुक केली हे मान्य पण आयसीसीने DRS प्रणाली अधिक अचुक प्रामुख्याने बॉल ट्रॅकिंगबाबत पुर्नविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian cricket team objection on DRS system