Dilip Sardesai |टर्फ विकेटवर न खेळणारा मुलगा २१व्या वर्षी भारताकडून क्रिकेट खेळला होता... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Former Batsmen Dilip Sardesai Who Played India at The Age Of 21 2 June Is His Death Anniversary

Dilip Sardesai |टर्फ विकेटवर न खेळणारा मुलगा २१व्या वर्षी भारताकडून क्रिकेट खेळला होता...

या क्रिकेटरचे नाव आहे दिलीप नारायण सरदेसाई. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४० रोजी गोवा येथील मडगाव येथे झाला. त्यावेळी गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. त्यामुळे तिथे क्रिकेट खेळाकरता पायाभूत सुविधा सोडाच साधी खेळपट्टीदेखील नव्हती. पुढे वयाच्या सतराव्या वर्षी दिलीप सरदेसाई (Dilip Sardesai) मुंबईत आले. त्यांनी विल्सन कॉलेजात प्रवेश घेतला आणि ठरवून टाकलं की आपण देखील क्रिकेट खेळायचं.

हे ठरवायचं कारण अस होतं की त्यांचा चुलत भाऊ असलेला सोपान देसाई याला भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) आलेले यश दिलीपच्या डोळयात बसले आणि गडी मनलावुन क्रिकेट खेळू लागला.

हेही वाचा: चंद्रकांत दादांचं बुमराच्या फटकेबाजीवर ट्विट, कार्यकर्त्यांची मज्जेशीर प्रतिक्रिया

पुढे मुंबईचे अदभूतपुर्व रणजी खेळाडू असणारे एम.एस.नाईक यांच्या तालमीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप क्रिकेट खेळू लागला. पुढे त्यांनी प्रचंड सराव करुन फर्स्ट क्लास क्रिकेट विद्यापीठाकडून खेळण्यास सुरुवात केली. या खेळादरम्यान एका निवड चाचणीत त्या वेळचे मुख्य निवडकर्ता लाला अमरनाथ यांनी दिलीप यांची फलंदाजी पाहिली. आणि दिलीपच्या फलंदाजीच्या कौशल्याने प्रभावित ते अत्यंत प्रभावित झाले

या संदर्भात ‘लक बाय टॅलेंट’ या पुस्तकात सुरेश मेनन यांनी लिहिले आहे, लालाजी दिलीप यांना म्हणाले मला तुमची फलंदाजी आवडली पण इतर निवडकर्त्यांना खेळाच्या तंत्राविषयी काही माहीत नाही. म्हणून तुम्ही हवेमध्ये काही चेंडू मारा म्हणजे ते खूश होतील.

सरदेसाई यांनी लालाजींच्या सूचनांचे पूर्णपणे पालन केले आणि त्यांची भारतीय संघात निवड झाली.

लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने पाकिस्तानविरुद्धच्या विद्यापीठाच्या सामन्यासाठी दिलीप यांची निवड केली. त्यांनी तेव्हा ८७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध अध्यक्षीय एकदिवसीय सामन्याचे प्रतिनिधित्व करताना शतक झळकावले. त्यानंतर त्यांना पुढे बॉम्बे संघाकडून खेळण्याची संधी मिळाली.

हेही वाचा: Deepak Hooda | इकडे बुमराह तिकडे हुड्डा! सामना जिंकून देणारी केली खेळी

१९६१ मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी स्थानिक पातळीवर भरपूर धावा केल्या होत्या. १७ वर्षांचा होण्यापूर्वी टर्फ विकेटवर न खेळणारा मुलगा २१व्या वर्षी भारताकडून खेळत होता.

दिलीप सरदेसाई फिरकीसोबत द्रुतगती गोलंदाजी सहजतेने खेळत होते.

१९६१ च्या वेस्टइंडिज दौऱ्यात नरी कॉन्ट्रॅक्टर जखमी झाल्यानंतर सरदेसाई यांनी वेस्टइंडीजच्या आग ओकणाऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर सलामीचे फलंदाज म्हणून जाण्याचे धाडस दाखवले. त्या सामन्यात ३१ व ६० धावा काढल्या. १९७१ च्या वेस्टइंडिज दौऱ्याच्या पूर्वसंध्येला सरदेसाई म्हणाले होते

"मी इथे धावा काढून आलोय आणि जातानाही स्वतःच्या नावावर धावा लावूनच जाणार आहे." आणि नंतर त्यांनी इतिहास घडविला.

त्या मालिकेत सुनील गावसकर यांनी सर्वाधिक ७७४ धावा केल्या व भारतीय क्रिकेटचे नवीन सुपरस्टार म्हणून उदयाला आले. गावसकर तेव्हा म्हणाले होते, दिलीप सरदेसाई यांनी वेगवान गोलंदाजी कशी खेळायची हे आम्हाला दाखवले आणि त्यांच्या सूचना ऐकल्याने आम्हाला वेस्ट इंडिजला हरवायचा आत्मविश्वास मिळाला.

हेही वाचा: PHOTO: 'कर्णधार' बुमराहचा दणका; पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम

दिलीप यांनीदेखील ६४२ धावा फटकावत ती मालिका गाजवली. त्यांच्या शानदार शतकी खेळीमुळे भारताने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला पराजित केले आणि वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला मालिका विजय मिळविला.

सरदेसाई यांनी बॉम्बे संघासाठी ६१ रणजी सामने खेळताना ५४ च्या सरासरीने धावा केल्या.

त्यांच्या नावे एक अनोखा विक्रम आहे. बॉम्बे संघासाठी त्यांनी खेळलेल्या एकाही सामन्यात बॉम्बे संघ हरला नाही. सरदेसाई यांनी १९७२ मध्ये क्रिकेटला रामराम ठोकला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १७९ सामने खेळताना १०,००० हून अधिक धावा प्रथम केल्या. ३० कसोटी सामन्यांत ५ शतकांसह ३९.२३ च्या सरासरीने २,००१ धावा केल्या होत्या.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य काही दिवस मुंबई काही दिवस गोवा अशा ठिकाणी राहुन घालवलं.

पुढे आजारपणामुळे २ जुलै २००७ रोजी हा महान क्रिकेटपटू जग सोडून कायमचे निघून गेले.

Web Title: Indian Former Batsmen Dilip Sardesai Who Played India At The Age Of 21 2 June Is His Death Anniversary

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..