तीन सेकंद असताना भारताने गोल स्वीकारला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पाच पेनल्टी कॉर्नर दवडत भारतीय कुमार हॉकी संघाने आपले आव्हान खडतर केले आणि तीन सेकंद बाकी असताना गोल स्वीकारत सुलतान ऑफ जोहोर कप कुमार हॉकी स्पर्धेतील ब्रिटनविरुद्धची निर्णायक लढत गमावली.

मुंबई : पाच पेनल्टी कॉर्नर दवडत भारतीय कुमार हॉकी संघाने आपले आव्हान खडतर केले आणि तीन सेकंद बाकी असताना गोल स्वीकारत सुलतान ऑफ जोहोर कप कुमार हॉकी स्पर्धेतील ब्रिटनविरुद्धची निर्णायक लढत गमावली.

मलेशियातील या स्पर्धेत भारताने प्राथमिक साखळीत गुणतक्‍त्यात अव्वल क्रमांक मिळवून विजेतेपदाच्या आशा उंचावल्या होत्या. निर्णायक अंतिम सामन्यातही सुरुवातीस भारतीय आक्रमकांचे वर्चस्व दिसत होते, पण भारतीय आक्रमकांना ब्रिटन गोलरक्षकास चकवण्यात अपयश आले. त्यानंतरही गुरसाहिबजीत सिंगने भारतास आघाडीवर नेले होते; मात्र प्रतिआक्रमणात ब्रिटनने बरोबरी साधली. एवढेच नव्हे, तर अखेरच्या मिनिटात भारतीय आक्रमणच सरस दिसत असताना वेगवान प्रतिचाली रचत तीन सेंकद असताना विजयी गोल केला.

प्रतिस्पर्ध्यातील अखेरची साखळी लढत 3-3 बरोबरीत सुटली होती. भारतीयांनी आक्रमक सुरुवात करताना पहिल्या दोनही सत्रांत प्रत्येकी दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण यासह भारताचे मैदानी गोलचे प्रयत्न ब्रिटनने रोखले. सहाव्या पेनल्टी कॉर्नरवर भारताचा पहिला गोल झाला, त्या वेळी 11 मिनिटे होती. ब्रिटनच्या बरोबरीच्या गोलनंतरही भारतीय आक्रमकांचे वर्चस्व होते, पण प्रतिआक्रमणात ब्रिटन सरस ठरले.

भारतास या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी ब्रिटनविरुद्ध निसटती हार पत्करावी लागली. गतवर्षी ब्रिटनने भारतास 3-2 असे चकवले होते; तर या वेळीही भारतास एका गोलच्या फरकानेच पराभव पत्करावा लागला. आता ब्रिटनने विजेतेपद जिंकण्याच्या शर्यतीत भारतास 3-2 असे मागे टाकले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian junior hockey team loose the final in last seconds