Indian Olympic Association : सीईओची लवकर नियुक्ती करा; आयओसीचा आयओएला आदेश Indian Olympic Association Appoint CEO early; IOC mandate to IOA The Indian Olympic | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian-olympic-association

Indian Olympic Association : सीईओची लवकर नियुक्ती करा; आयओसीचा आयओएला आदेश

लॉसन (स्वित्झर्लंड) : भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) लवकरात लवकर आपल्या संघटनेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असे आदेश आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) केली आहे. बुधवार, २९ मार्च रोजी आयओसीच्या कार्यकारी समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये आयओएच्या नवीन कार्यकारी समितीला मान्यता देण्यात आली आहे.

आयओसीने आयओएच्या निवडणुकांना मान्यता दिली असली तरी त्यांना लवकरात लवकर मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश सुद्धा दिले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करता येत नसेल तर सरचिटणीसपदावर नियुक्ती करायचा प्रयत्न करण्यात यावा अशी सुद्धा विनंती त्यांनी आयओएला केली आहे. या बैठकीमध्ये आयओसीने मुंबईमध्ये यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात आयओसीचे १४० वे अधिवेशन होणार असल्याचे घोषित केले आहे.

यासर्व घटनांवर आयओसीने निवेदन जाहीर केले असून, ‘‘ आम्ही भारताच्या राष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीला आणि नवीन अध्यक्षांना मान्यता दिली आहे. तसेच यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईमध्ये आयओसीचे १४० वे अधिवेशन होणार आहे.

’’ असे त्यात म्हंटले आहे. भारताच्या माननीय सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या पॅनेलने तयार केलेल्या आणि आयओसीने मंजूर केलेल्या नवीन संविधानानुसार, आयओए ने एक मुख्य कार्यकारी नियुक्त करायचा होता जो पूर्वीच्या सरचिटणीसची कार्ये पार पाडेल, त्यांच्या नेतृत्वाखालील नवीन कार्यकारी परिषदेचा पदभार घेतल्यानंतर एका महिन्याच्या आत पीटी उषा. नवीन आयओए कौन्सिलने १० डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला, परंतु आजपर्यंत सीईओची नियुक्ती झालेली नाही.