बॉक्‍सिंग स्पर्धेपासून भारतीय खेळाडू वंचित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

जर्मनीतील स्पर्धेसाठी व्हिसा मिळण्यास उशीर
नवी दिल्ली - भारताच्या बॉक्‍सिंग खेळाडूंचे जर्मनीतील "केमिस्ट्रि करंडक' स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. या स्पर्धेसाठी खेळाडूंना व्हिसा मिळण्यास उशीर झाल्याने या स्पर्धेतील सहभागास मुकावे लागले.

भारताने या स्पर्धेसाठी नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला 10सदस्यीय संघ जाहीर केला होता. शनिवारीच हे खेळाडू जर्मनीतील हॅलेसाठी रवाना होणार होते. मात्र, वेळेत व्हिसा न पोचल्याने त्यांना विमान आणि स्पर्धेतील सहभाग सोडून द्यावा लागला.

भारतीय बॉक्‍सिंग महासंघाने याबाबत निराशा व्यक्त केली असून, खेळाडूंना लवकरच अन्य एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येईल, असा विश्‍वास व्यक्त केला. महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग म्हमाले, 'या स्पर्धेसाठी शेनजेनसाठी व्हिसा अर्ज तुम्ही ज्या विभागातून येणार आहात तेथून करणे अपेक्षित होते. ही माहिती आम्हास नव्हती. आम्ही सेंट्रलाईज पद्धतीने दिल्लीतून व्हिसा अर्ज केला. त्यामुळे ही अडचण आली. अर्थात, आम्ही खेळाडूंचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांना लवकर अन्य एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निश्‍चित पाठवू.''

Web Title: indian player boxing competition deprived