चेन्नई बॉईज इज बॅक; धोनीचे IPL 2022 मिशन सुरू

indian premie leagu 2022 MS Dhoni joins Chennai Super Kings camp practice Surat
indian premie leagu 2022 MS Dhoni joins Chennai Super Kings camp practice Suratsakal

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) चे काउंटडाऊन सुरू झाले आहे. संपूर्ण वेळापत्रकही जाहीर झाले आहे. 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे मैदानावर पहिला सामना होणार आसून, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने-सामने येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2022 ची तयारी सुरू केली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू सुरतला पोहोचले आहेत. CSK संघ येथे सराव करताना दिसत आहे. (MS Dhoni joins Chennai Super Kings camp)

चेन्नई सुपर किंग्ज कॅम्पचा सुरूवात झाली आहे. बसमधील सर्व खेळाडू स्टेडियमवर पोहोचले. यादरम्यान महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी सुरतच्या रस्त्यांवर गर्दी जमली होती आणि लोक 'थला'ची झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. धोनीचा एक फोटो चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवर शेअर केला आहे. टीमने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आम्ही सगळे पहिल्या दिवसाची वाट पाहत आहोत.

IPL लीग टप्प्यातील सर्व 70 सामने महाराष्ट्रात खेळवले जातील. ५५ सामने मुंबईत तर १५ सामने पुण्यात होणार आहेत. 20 सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियम आणि डी. वाय. पाटील स्टेडीयम, तर 15 सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. उर्वरित १५ सामने पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.

आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे सामने -

1. 26 मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

2. 31 मार्च - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

3. 3 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज

4. 9 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30)

5. 12 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

6. 17 एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

7. 21 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

8. 25 एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

9. 1 मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

10. 4 मे - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

11. 8 मे - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

12. 12 मे - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

13. 15 मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30)

14. 20 मे - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com