रशिया ओपन बॅडमिंटन भारताच्या सौरभसह रितुपर्णा एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जुलै 2018

भारताचे माजी राष्ट्रीय विजेते सौरभ वर्मा आणि रितुपर्णा दास यांनी रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. 
 

व्लाडिवोस्टोक (रशिया) - भारताचे माजी राष्ट्रीय विजेते सौरभ वर्मा आणि रितुपर्णा दास यांनी रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. 

या दोघांबरोबरच मिथुन मंजुनाथ, शुभांकर डे आणि वृषाली गुमाडी यांनीही एकेरी, तर अरुण जॉर्ज-सन्यम शुक्‍ला यांनी पुरुष दुहेरी, रोहन कपूर-कुहू गर्ग, सौरभ वर्मा-अनुष्का पारिख यांनी मिश्र दुहेरीतून आपली आगेकूच कायम राखली आहे. 

दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सौरभवने आपली आशियाई स्पर्धेसाठीची निवड सार्थ ठरवताना रशियाच्या सर्गी सिरांट याचा 21-11, 21-9 असा पराभव केला. आठव्या मानांकित सौरभची गाठ आता इस्राइलच्या तिसऱ्या मानांकित मिशा झिबेरमन याच्याशी पडणार आहे. 

महिला एकेरीत रितुपर्णा हिने सनसनाटी निकालाची नोंद केली. तिने मलेशियाच्या द्वितीय मानांकित यिंग यिंग ली हिचे आव्हान पहिली गेम गमाविल्यानंतर 13-21, 21-17, 21-19 असे परतवून लावले. तिची गाठ आता पात्रता फेरीतून आलेल्या अमेरिकेच्या इरिस वॅंग हिच्याशी पडणार आहे. 

अन्य निकाल 
एकेरी (पुरुष) मिथुन मंजुनाथ वि. वि. कोजी नाईटो (जपान) 21-16, 21-13, शुभांकर डे वि. वि. सिद्धार्थ प्रताप सिंग (भारत) 21-11, 21-19, महिला ः वृषाली गुमाडी वि. वि. बियोल लिम ली (कोरिया) 21-11, 21-13, मुग्घा अग्रे पराभूत वि. इरिस वॅंग 4-21, 13-21 
दुहेरी (पुरुष) ः अरुण जॉर्ज-सन्यम शुक्‍ला वि. वि. जेफ्री लॅम-हिन शुन वॉंग 21-12, 21-13, (मिश्र) रोहन कपूर-कुहू गर्ग वि. वि. ऍलेक्‍सी पानोव-पोलिना माक्कोविवा 21-10, 21-14, सौरभ वर्मा- अनुष्का पारिख वि. वि. आर्टेम सेर्पिओनोव- ऍनास्तासिया पुस्तिनस्काईया 21-6, 21-5.

Web Title: Indian shuttlers continue good run at Russia Open