esakal | IPL 2021: कुलदीप यादवच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Kuldeep-Yadav

कुलदीप यादवला IPL स्पर्धेदरम्यान झाली होती गंभीर दुखापत

IPL 2021: कुलदीप यादवच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

sakal_logo
By
विराज भागवत

अबुधाबी: भारतीय संघाचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव याच्या गुडघ्यावर बुधवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या IPL स्पर्धेदरम्यान कुलदीपला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कुलदीपने आपल्या ट्वीटर हँडलवरून शस्त्रक्रियेची माहिती दिली. माझ्या गुडघ्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता मी लवकरच तंदुरूस्त होईन. ज्या-ज्या लोकांनी मला सहकार्य केले, त्या साऱ्यांचे आभार. मी आता तंदुरूस्त होण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. एकदा मी तंदुरुस्त झालो की मी लवकरच मैदानात परतेन, अशी माहिती कुलदीपने आपल्या ट्वीटर हँडलवर दिली.

हेही वाचा: Video : मुंबईकराची खिलाडूवृत्ती! राहुलला आधी आउट केलं अन् खेळ म्हणाला...

२७ सप्टेंबरला पीटीआयने कुलदीप दुखापतग्रस्त झाल्याची माहिती दिली होती. कुलदीपच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून तो आगामी क्रीडा स्पर्धांना मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुलदीप IPLच्या दुसऱ्या टप्प्यातून मध्यातच माघार घेऊन परत आला होता. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

हेही वाचा: IPL 2021: विजयानंतर मुंबईचा 'हिटमॅन' काय म्हणाला, वाचा...

कुलदीप यादवने आतापर्यंत भारताकडून सात कसोटी, ६५ वन डे आणि २३ टी२० सामने खेळले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून कुलदीपने १७४ आंतरराष्ट्रीय बळी टिपले आहेत. कुलदीप यादव भारताकडून काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर खेळला होता. त्यावेळी त्याने वन डे सामन्यात ४८ धावा देऊन २ बळी टिपले. तर शेवटच्या टी२० सामन्यात ३० धावा देऊन २ गडी बाद केले. त्याशिवाय त्याने त्या दौऱ्यावर आणखी एक वन डे आणि एक टी २० सामना खेळला होता. पण त्या दोनही सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आला नाही.

loading image
go to top