esakal | INDvsNZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; धवनसह राहुलचीही निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Indian T20I Team For New Zealand Tour Announced

रोहित शर्माचा सलामीला साथीदार शिखर धवन की के एल राहुल हा वाद राष्ट्रीय निवड समितीने न सोडवणेच पसंत केले. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्‌वेंटी 20 मालिकेसाठी निवड समितीने तीन सलामीवीरांना निवडले आहे.

INDvsNZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; धवनसह राहुलचीही निवड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रोहित शर्माचा सलामीला साथीदार शिखर धवन की के एल राहुल हा वाद राष्ट्रीय निवड समितीने न सोडवणेच पसंत केले. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्‌वेंटी 20 मालिकेसाठी निवड समितीने तीन सलामीवीरांना निवडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय क्रिकेट मंडळाची निवड समिती न्यूझीलंडमधील तीन एकदिवसीय लढती तसेच पाच ट्‌वेंटी 20 सामन्यांसाठी रविवारी निवड करणार असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात केवळ ट्‌वेंटी 20 मालिकेसाठीच संघ रविवारी रात्री जाहीर करण्यात आला. 

उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजे आणि राऊत यांच्यात ट्विटरयुद्ध

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील संघात फारसा बदल करण्यात आला नाही. अतिरिक्त यष्टिरक्षक संजू सॅमसन याच्याऐवजी सलामीवीर रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. ही निवड करताना रिषभ पंतवर पूर्ण विश्‍वास दाखवण्यात आला. 


भारतीय संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर. 

loading image
go to top