भारतीय संघाची देशभक्ती; लष्कराची कॅप घालून टीम इंडिया मैदानात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 मार्च 2019

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ पुलावामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय लष्कराची टोपी घालून उतरणार आहे. नाणेफेकीपूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघातील सर्व खेळाडूंना या टोप्यांचे वाटप केले. 

रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ पुलावामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय लष्कराची टोपी घालून उतरणार आहे. नाणेफेकीपूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघातील सर्व खेळाडूंना या टोप्यांचे वाटप केले. 

बीसीसीआयतर्फे दरवर्षी भारतीय लष्कराला मानवंदना देण्यासाठी एक सामना खेळण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ही कल्पना धोनी आणि कोहलीने दिली आहे. तसेच या सामन्याचे संपूर्ण मानधन टीम इंडिया हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना देणार असल्याची घोषणा कोहलीने केली आहे. 

भारताने तिसऱ्या सामन्यात नाणेफक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानावर उतरेल. तिसऱ्या सामन्यापासून संघात परतलेल्या भुवनेश्वर कुमारला अंतिम संघात स्थान दिले जाईल अशी अपेक्षा होती मात्र, भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian team to wear special caps for indian army