भारतीय महिला संघाचाही किवींना दणका; मालिकेत विजय

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 जानेवारी 2019

माऊंट मौनागुई : भारतीय महिला क्रिकेट संघानेदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. याच विजयासाह भारताने तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली. न्यूझीलंडने दिलेले 162 धावांचे आव्हान स्मृती मानधना आणि मिताली राजच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने सहज पार केले. 

प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने केवळ 161 धावांची मजल मारली. पुरुष असो वा महिला भारतीय गोलंदाजी न्यूझीलंडसाठी कर्दनकाळ ठरली आहे. झूलन गोस्वामी, दिप्ती शर्मा, एकता बिश्त आणि पूनम पांडे यांनी सर्वांना मिळून न्यूझीलंडला 44.2 षटकांतच रोखले. 

त्यानंतर न्यूझीलंडने दिेलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरवातही अडखळत झाली. रॉड्रीग्ज आणि दिप्ती दोघीही स्वस्तात माघारी फिरल्या. मात्र, त्यानंतर मिताली आणि स्मृतीने अनुक्रमे 63 आणि 90 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. 36 व्या षटकात विजयासाठी दोन धावांची गरज असताना मितलाीने षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian women s cricket team wins against New Zealand