नेशन्स कप बॉक्‍सिंगमध्ये भारतीय महिला तिसऱ्या 

पीटीआय
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मुंबई - राष्ट्रीयविजेत्या नीरजाने सहाव्या नेशन्स कप बॉक्‍सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. व्रॅबास (सर्बिया) येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय महिलांनी सहा पदकांसह तिसरा क्रमांक मिळविला. 

मुंबई - राष्ट्रीयविजेत्या नीरजाने सहाव्या नेशन्स कप बॉक्‍सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. व्रॅबास (सर्बिया) येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय महिलांनी सहा पदकांसह तिसरा क्रमांक मिळविला. 

पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असलेल्या नीरजाने निर्णायक लढतीत कझाकस्तानच्या जैना शेकेर्बेकोवा हिला हरवले. माजी जागतिक उपविजेती सरजूबाला देवी (48 किलो), प्रियांका चौधरी (60 किलो), पूजा (69 किलो) आणि सीमा पुनिया (81 किलोपेक्षा जास्त) यांनी रौप्यपदक जिंकले. कविता गोयत हिने ब्रॉंझपदक जिंकले. ती उपांत्य फेरीत पराजित झाली. तिला या लढतीच्या वेळी दुखापत झाली. तिच्या गुडघ्यावर आता शस्त्रक्रिया करावी लागेल. 

सरजूबाला रशियाच्या युलिया चुमगॅलाकोवा हिच्याविरुद्ध 2-3 अशी पराजित झाली, तर प्रियांकाला कझाकस्तानच्या रिम्मा वोलोसेंको हिने हरवले. पूजाला व्हॅलेंटिनो खॅलझोवा हिच्याविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले. सीमाला कझाकस्तानच्या ल्यिझ्झात कुंगेनबायेवा हिने पराभूत केले. 

दोन दशक पुरुष संघाचे राष्ट्रीय मार्गदर्शक असलेले गुरुबक्षसिंग संधू यांच्याकडे आता महिला संघाची धुरा सोपवण्यात आली. या स्पर्धेत भारतीय संघ तिसरा आला. कझाकस्तान आणि रशियाने पहिले दोन क्रमांक मिळविले. 

या स्पर्धेतील कामगिरी नक्कीच सुखावणारी आहे. स्पर्धेपूर्वी केवळ 25 दिवसांचे शिबिर झाले होते. तरीही संघाने चमकदार कामगिरी केली. त्यांनी देशाची शान उंचावली आहे. 
- गुरुबक्षसिंग संधू, भारतीय प्रशिक्षक 

Web Title: Indian women's boxing in the third Nations Cup