विश्‍वकरंडक तिरंदाजी : भारतीय महिलांना कंपाउंडमध्ये रौप्य 

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

मुंबई : भारतीय महिलांनी तुर्की विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात रौप्यपदक जिंकले. त्यांना तैवानविरुद्धच्या चुरशीच्या अंतिम लढतीत हार पत्करावी लागली, पण तरीही त्यांनी या स्पर्धेतील भारताचे पदकाचे खाते उघडले. 

ज्योती सुरेखा, मुस्कान किरार आणि दिव्या दयालने चांगला प्रतिकार केला, पण भारतास 228-231 अशी हार पत्करावी लागली. पहिल्या फेरीत दोन, दुसऱ्या फेरीत तीन गुणांनी मागे पडल्यामुळे भारत तिसऱ्या फेरीपूर्वी 112-117 असा मागे होता. तिसऱ्या फेरीत भारतीयांनी दोन गुणांची आघाडी घेतली, तर चौथी फेरी बरोबरीत सुटली, त्यामुळे भारतास हार पत्करावी लागली. 

भारत प्राथमिक फेरीनंतर दहावा होता, पण सांघिक स्पर्धेत भारताने सरस मानांकन मिळविलेल्या संघांना हरवले. इटलीला टायब्रेकरवर 27-26 असे हरवून सुरुवात केलेल्या भारताने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेला 234-230, तर उपांत्य फेरीत तुर्कीला 233-224 असे पराजित केले. 

मिश्र दुहेरीत अभिषेक वर्मा-ज्योती सुरेखाला ब्रॉंझ पदकाची संधी आहे. तिसऱ्या मानांकित भारतीय जोडीने स्लोवेनियास 155-153 आणि नेदरलॅंडस्‌ला 155-152 असे हरवले, पण उपांत्य फेरीत फ्रान्सविरुद्ध 153-155 अशी हार पत्करावी लागली. पुरुष संघास उपांत्य फेरीत कोरियाने 238-234 असे हरवले. 

ऑलिंपिकमध्ये स्थान असलेल्या रिकर्व्हमध्ये भारतीय महिलांना ब्रॉंझची संधी आहे. अंकिता भकत, प्रोमिला दाईमेरी आणि दीपिका कुमारीचा भारतीय संघ उपांत्य फेरीत कोरियाविरुद्ध 2-6 असा पराजित झाला. तिसरा सेट जिंकून प्रतिकार सुरू केलेल्या भारतीयांनी चौथा सेट एका गुणाने गमावला. मिश्र दुहेरीत दीपिका कुमारी-अतानू दास उपांत्यपूर्व फेरीत टायब्रेकरवर पराजित झाले.

Web Title: Indian womens team gets silver in world cup archery