भारतीय कुस्तीगीराची चौकशी

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरीनंतरही भारतीय खेळाडूंभोवती असलेले वाद काही संपण्याची चिन्हे नाहीत. ऑस्ट्रेलियन पोलिस आणि स्पर्धा संयोजकांनी रविवारी अधिस्वीकृती कार्डवर मित्राला प्रवेश दिल्याने एका भारतीय कुस्तीगीराची चौकशी केल्याचे वृत्त आहे. 

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरीनंतरही भारतीय खेळाडूंभोवती असलेले वाद काही संपण्याची चिन्हे नाहीत. ऑस्ट्रेलियन पोलिस आणि स्पर्धा संयोजकांनी रविवारी अधिस्वीकृती कार्डवर मित्राला प्रवेश दिल्याने एका भारतीय कुस्तीगीराची चौकशी केल्याचे वृत्त आहे. 

या घटनेशी निगडित असलेल्या कुस्तीगीराचे नाव उघड केले नसले, तरी या कुस्तीगीराने शनिवारी (ता. १४) पदक जिंकल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्या दिवशी भारताकडून सुमीतने सुवर्ण, तर सोमवीरने ब्राँझपदक जिंकले होते; मात्र यांच्यापैकी नेमक्‍या कोणी अधिस्वीकृती कार्डचा गैरवापर केला हे स्पष्ट झालेले नाही. या दोषी खेळाडूस संयोजकांनी कडक शब्दांत ताकीद दिल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात राष्ट्रकुल स्पर्धेसाठी असलेल्या भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या पथकापैकी एकाही अधिकाऱ्याने तसेच भारतीय कुस्तीगीर संघटनेच्या  पदाधिकाऱ्याने कुठलीही पुष्टी दिलेली नाही. 

दरम्यान, कुस्तीगीर संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने संबंधित कुस्तीगीर आपल्या मित्रास अधिस्वीकृती कार्डद्वारे स्पर्धा केंद्रावर प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. स्थानिक पोलिसांनी भारतीय कुस्तीगीराचे कार्ड वापरून एक व्यक्ती स्पर्धा केंद्रावर फिरत असताना आढळल्याचे सांगितले आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता, तो आपली ओळख देऊ शकला नाही. केवळ भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळेच या दोघांना सोडण्यात आल्याचेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

या प्रकरणी संयोजकांनी भारतीय पथकप्रमुख विक्रम सिसोदिया यांना माहिती दिली असून, त्यांनी त्या कुस्तीगीराशी चर्चा केल्याचे वृत्त आहे; मात्र शेवटपर्यंत त्या मल्लाचे नाव समजू शकले नाही.

Web Title: Indian wrestling inquiry