ISSF World Cup : भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंहचा सुवर्णवेध; 50 मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये जिंकले गोल्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ISSF World Cup Aishwary Pratap Singh Tomar

ISSF World Cup : भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंहचा सुवर्णवेध; 50 मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये जिंकले गोल्ड

ISSF World Cup Aishwary Pratap Singh Tomar : भारताचा नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने आयएसएसएफ वर्ल्डकप शूटिंग स्पर्धेत सुवर्णवेध घेतला. त्याने पुरूष 50 मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. कौरो येथे सुरू असलेल्या ISSF Shooting World Cup स्पर्धेत भारताने आतापर्यंत 6 मिलिटरी मेडल आणि 4 सुवर्ण पदके पटकावली आहेत.

यापूर्वी ISSF Shooting World Cup स्पर्धेत महाराष्ट्रातील ठाणे येथील मराठमोळा नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने शूटींग रेंजवर पुन्हा एकदा अचूक निशाणा साधला.

या पठ्ठ्याने इजिप्तमधील कैरो येथे सुरु असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. हे त्याचे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले.

रुद्रांक्ष पाटील याने सोमवारी १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात आर. नर्मदा नितीन हिच्या साथीने त्याने सुवर्णपदक पटकावले होते. भारतीय नेमबाजांची या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी मंगळवारीही कायम राहिली.

भारतीय संघातील खेळाडूंनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चार सुवर्णपदके जिंकली आहेत. रुद्रांक्ष पाटीलने वैयक्तिक सुवर्णपदकासह आर. नर्मदा नितीन हिच्यासोबत मिश्रमध्येही सुवर्णपदक पटकावले आहे.

तसेच वरुण तोमर याने वैयक्तिक गटात ब्राँझपदकावर हक्क सांगितला असून त्याने मिश्र गटात रिदम सांगवानच्या साथीने सुवर्णपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

टॅग्स :sports