आशियाई ल्यूज अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताच्या शिवा केशवनला सुवर्ण 

वृत्तसंस्था
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नॅगानो (जपान) - हिवाळी ऑलिंपिकमधील लोकप्रिय ल्यूज या क्रीडा प्रकारातील भारताचा प्रमुख खेळाडू शिवा केशवन याने आशियाई ल्यूज अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. निर्विवाद वर्चस्व राखताना केशवन याने दुसरी शर्यत 1 मिनीट 39.962 सेकंदांनी जिंकताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. जपानचा तनाका शोहेई (1ः44.874 सेकंद) दुसरा आला. तैवानचा लिएन ते ऍन (1ः45.120 सेकंद) ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. या तिघांत केशवन याने ताशी 130.4 कि.मी. असा सर्वोत्तम वेग राखला. याच आठवड्यात सराव करताना केशवन याने इतकाच वेग राखला होता. मात्र, त्या वेळी त्याचा स्लेड तुटला आणि त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती.

नॅगानो (जपान) - हिवाळी ऑलिंपिकमधील लोकप्रिय ल्यूज या क्रीडा प्रकारातील भारताचा प्रमुख खेळाडू शिवा केशवन याने आशियाई ल्यूज अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. निर्विवाद वर्चस्व राखताना केशवन याने दुसरी शर्यत 1 मिनीट 39.962 सेकंदांनी जिंकताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. जपानचा तनाका शोहेई (1ः44.874 सेकंद) दुसरा आला. तैवानचा लिएन ते ऍन (1ः45.120 सेकंद) ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. या तिघांत केशवन याने ताशी 130.4 कि.मी. असा सर्वोत्तम वेग राखला. याच आठवड्यात सराव करताना केशवन याने इतकाच वेग राखला होता. मात्र, त्या वेळी त्याचा स्लेड तुटला आणि त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे अधिकृत सराव शिबिरात तो सहभागी होऊ शकला नाही. मात्र, त्याने जिद्दीने स्पर्धेत सहभागी होत विजेतेपद मिळविले. याच वर्षी पुरेशा निधीअभावी केशवनला जागतिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. 

Web Title: India's Shiva Keshavan Asian Luge Championships gold