युकीची आगेकूच कायम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मेलबर्न - भारताच्या युकी भांब्रीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीत दुसरा सामना जिंकला. त्याने पेड्या क्रस्टीनला हरविले. आता त्याने अखेरच्या पात्रता सामन्यात प्रवेश मिळविला आहे. एक तास आठ मिनिटे चाललेल्या लढतीत त्याने तिन्ही ब्रेकपॉइंट वाचविले. जागतिक क्रमवारीत युकी 381, तर क्रस्टीन 216व्या क्रमांकावर आहे. पहिल्या सेटमध्ये त्याने सहाव्या, तर दुसऱ्या सेटमध्ये पाचव्या गेममध्ये सर्व्हिसब्रेक नोंदविला. युकीसमोर आता अमेरिकेचा उदयोन्मुख टेनिसपटू एर्नेस्टो एस्कोबेडो याचे आव्हान असेल. एर्नेस्टोला 21वे मानांकन असून तो 133व्या स्थानावर आहे. युकीने सांगितले, "मी चांगला खेळ केला.

मेलबर्न - भारताच्या युकी भांब्रीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीत दुसरा सामना जिंकला. त्याने पेड्या क्रस्टीनला हरविले. आता त्याने अखेरच्या पात्रता सामन्यात प्रवेश मिळविला आहे. एक तास आठ मिनिटे चाललेल्या लढतीत त्याने तिन्ही ब्रेकपॉइंट वाचविले. जागतिक क्रमवारीत युकी 381, तर क्रस्टीन 216व्या क्रमांकावर आहे. पहिल्या सेटमध्ये त्याने सहाव्या, तर दुसऱ्या सेटमध्ये पाचव्या गेममध्ये सर्व्हिसब्रेक नोंदविला. युकीसमोर आता अमेरिकेचा उदयोन्मुख टेनिसपटू एर्नेस्टो एस्कोबेडो याचे आव्हान असेल. एर्नेस्टोला 21वे मानांकन असून तो 133व्या स्थानावर आहे. युकीने सांगितले, "मी चांगला खेळ केला. माझी सर्व्हिस चांगली झाली. मी मोक्‍याच्या क्षणी ब्रेक मिळविणे महत्त्वाचे ठरले. अखेरच्या फेरीतील सामना खडतर असेल.'

Web Title: India's Yuki bhambri win the second qualifying round of the Australian Open