INDvsENG Pitches Controversy : खेळपट्टीवरुन वादग्रस्त ठरलेल्या 5 मोठ्या घटना

IndvsENG ,History about cricket, controversy with poor pitches
IndvsENG ,History about cricket, controversy with poor pitches

Controversy With Poor Pitches : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चेन्नईत रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर खेळपट्टीवरुन उलट सुलट चर्चा सुरु झालीय. गर्तेत अडकलेला साहेबांचा संघाला पाठिंबा देणारे दिग्गज खेळपट्टीवरुन टीम इंडियाला टार्गेट करताना पाहायला मिळाले. खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी तयार केली हे अगदी बरोबर असले तरी ती प्रतिस्पर्धी संघाच्या पराभवासाठी बनलीये असे म्हणता येणार नाही. सामन्याचा निकाल चौथ्या दिवसावर गेल्यावर हा मुद्दा तसा गौणच वाटतो. खेळपट्टीवरुन वाद निर्माण होणारी ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही भारतीय खेळपट्टींसदर्भात मोठ्या वादविवादाच्या घटना घडल्या आहेत. नजर टाकूयात अशा काही मोजक्या आणि घटना कधी आणि कोणत्या शहरातील खेळपट्टीसंदर्भात रंगल्या होत्या यावर ...

2017 मध्ये पुण्याची खेळपट्टी ठरली होती वादग्रस्त

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना  पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळवण्यात आला होता.  विशेष म्हणजे पुण्याच्या मैदानात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी 333 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. आयसीसीचे रेफ्री ख्रिस बोर्ड यांनी खेळपट्टी खराब होती, असा अहवाल सादर केला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन स्टीव्ह ऑकिफ आणि नॅथन लायन यांनी आपल्या फिरकीची कमाल दाखवली होती.  स्टीव्ह ओकेफनं  70 धावा खर्चून 12 विकेट घेतल्या होत्या 

भारत -इंग्लंड यांच्यातील चौथ्या दिवशीच्या सामन्यातील अपडेट्स एका क्लिकवर

1997 इंदुरच्या  मैदानील सामना खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती

25 डिसेंबर 1997 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामना इंदुरच्या नेहरु स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. 18 चेंडूचा खेळ झाल्यानंतर खेळपट्टी खराब असल्यामुळे सामना रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. खेळपट्टी खराब असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामना रद्द करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मैदानात उपस्थिती असलेल्या चाहत्यांच्या मागणीवरुन अनाधिकृतपणे 25-25 षटकांचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेनं दोन धावांनी विजय मिळवला होता. 
 
2008  तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या बाजून लागला होता निकाल.

2008 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानात रंगला होता. यावेळी आयसीसीने खेळपट्टीवर ताशेरे ओढले होते. तिसऱ्या दिवशी सामन्याचा निकाल टीम इंडियाच्या बाजूनं लागला होता. सामन्यानंतर कानपूर क्रिकेट असोसिएशनला नोटीस बजवाण्यात आली होती. भारतीय संघाने 8 गडी राखून सामना जिंकत आफ्रिकेसोबत 1-1 बरोबरी साधली होती. 

2009  श्रीलंकेच्या संघाने खेळण्याद दिला होता नकार

भारत आणि श्रीलंका यांच्यात फिरोजशहा कोटलाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात खेळपट्टीचा अजब-गजब तोरा पाहायला मिळाला होता.  23.3 षटकानंतर पाहुण्या श्रीलंका संघाने पुढे खेळण्यास नकार दिला होता. या सामन्यातील प्रकारानंतर आयसीसीने फिरोजशहा कोटला मैदानातील सामन्यावर बंदी घातली होती. 2011 च्या वर्ल्ड कपमधील सामने याठिकाणी खेळवण्यास परवानगी देण्यात आली होती.   

INDvsENG : 'बाप-माणूस' पुन्हा खवळला; कोहलीनं 'इज्जत'मध्ये पंचाशी घातली 'हुज्जत'

2015 नागपूरच्या खेळपट्टीवर पाहुण्यांचा घामटा निघाला

2015 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात नागपूरच्या मैदानात रंगलेला सामना अवघ्या तीन दिवसांत संपला होता. यावेळी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 124 धावांनी पराभूत केले होते. तीन दिवसांत 40 विकेट पडल्या होत्या. यातील 33 गडी हे फिरकीपटूंनी बाद केले होते. मुरली विजयच्या 40 धावसंख्या ही दोन्ही संघाकडून सर्वोच्च ठरली होती. खेळपट्टी निष्कृष्ट दर्जाची असल्याचा ठपका आयसीसीने ठेवला होता. 

एकंदरीत चेन्नईच्या मैदानातील परिस्थिती आतापर्यंत वादात अडकलेल्या खेळपट्टीच्या पलिकडची आहे. सामन्याचा निकाल हा चौथ्या दिवसावर गेलाय. त्यामुळे खेळपट्टी अतिशय खराब आहे, असे म्हणता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com