INDvsWI : भुवीला पुन्हा दुखापत, बदली खेळाडू पण असा घेतलाय की...

वृत्तसंस्था
Saturday, 14 December 2019

गेल्यावर्षीच्या आयपीएलपासून त्याला दुखापतींनी ग्रासले आहे. त्याला गत मोसमातील काही सामने पाठीच्या दुखण्यामुळे खेळता आले नव्हते. त्यानंतर त्याला इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतून अर्धाय्तून माघार घ्यावी लागली होती.

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या डोक्यावरुन दुखापतूंचे भूत काही केल्या उतरत नाहीये. नुकतेच दुखापतीतून परत त्याने ट्वेंटी मालिकेत भारतीय संघात पुनरागमन केले होते मात्र, त्याला पुन्हा दुखापत झाल्याने विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याजागी मुंबईच्या शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Bhuvneshwar Kumar will miss the West Indies ODIs with an injury (PTI Photo)

गेल्यावर्षीच्या आयपीएलपासून त्याला दुखापतींनी ग्रासले आहे. त्याला गत मोसमातील काही सामने पाठीच्या दुखण्यामुळे खेळता आले नव्हते. त्यानंतर त्याला इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतून अर्धाय्तून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळेच त्याला ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेवरही पाणी सोडावे लागले होते. 

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडकातही त्याचे स्नायू दुखावले होते. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्याला मैदान सोडून जावे लागले होते. त्यानंतर मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर अखेर भुवीने विंडीजविरुद्धच्या ट्वेंटी20 मालिकेत पुनरामगन केले खरे. मात्र, अखेरच्या सामन्यात त्याच्या स्नायूंना पुन्हा दुखापत झाली आणि त्यामुळेच आता त्याला एकदिवसीय मालिकेला मुकावे लागणार आहे. 

INDvsWI : विराटसारखी कठोर मेहनत घ्या!; विंडीज खेळाडूंना त्यांच्याच कोचचा सल्ला

Image result for shardul thakur hd images

भुवनेश्वरच्या जागी शार्दुलला संघात देण्यात आले आहे. त्याने आशिया कप 2018पासून भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. नवदीप सैनी दुखापतीतून अजून पूर्णपणे तंदुरुस्त झाला नसल्याने बीसीसीआयने शार्दुलची निवड केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injured Bhuvneshwar Kumar ruled out of ODI series vs West Indies Shardul Thakur name as a Replacement