संघातून बाहेर जायच्या भीतीने त्याने लपवली दुखापत 

वृत्तसंस्था
Friday, 27 December 2019

त्याच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो सामना खेळेल की नाही अशी शंका होती. मात्र, त्याने संघातून बाहेर जावं लागण्याची भीतीने स्कॅनिंगच करुन न घेता मैदानात उतरण्याचे धाडस केले.  

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरु असलेल्या बॉक्सिंग डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या सहभागाबाबत सगळ्यांना शंका होती. त्याच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो सामना खेळेल की नाही अशी शंका होती. मात्र, त्याने संघातून बाहेर जावं लागण्याची भीतीने स्कॅनिंगच करुन न घेता मैदानात उतरण्याचे धाडस केले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सामन्याच्या तीन दिवस आधी, सोमवारी सराव करत असताना त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने अंगठ्याला पट्टी बांधली होती त्यामुळे त्याची दुखापत गंभीर वाटत होती. मात्र, संघातून बाहेर जावं लागेल म्हणून त्याने त्या अंगठ्याचे स्कॅनिंग करुन घेण्यास नकार दिला. 

पाकला दाखवली लायकी; गांगुलींनी उचललं 'हे' मोठं पाऊल

दुखापत झाली असूनही तो मैदानात उतरला. त्याने पहिल्या डावात 64 चेंडूंत 41 धावा केल्या. आता त्याने स्वत: स्कॅनिंगला नकार दिल्याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, ''स्कॅनिंग आणि एक्सरे मुळे तुम्हाला नेहमी संघाबाहेरच जावं लागतं. त्यामुळे सामन्याआधी मी स्कॅनिंग करुन घेणं शक्यच नव्हतं.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injured David Warner Refused Scan On Thumb In Fear Of Being Ruled Out Of Boxing Day Test