मेस्सीला मागे टाकण्याची सुनील छेत्रीला आज संधी

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जून 2018

मुंबई - सुनील छेत्रीला आंतरराष्ट्रीय गोलच्या क्रमवारीत लिओनेल मेस्सीला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवण्याची संधी आहे. इंटरकॉंटिनेंटल कप स्पर्धेतील केनियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात छेत्रीने हॅट्ट्रिक केल्यास तो मेस्सीला मागे टाकेल. 

छेत्रीने 62 गोल केले आहेत आणि त्याची सामन्यामागील गोलची सरासरी 0.62 आहे. ही सरासरी जगातील सार्वकालिक अव्वल 10 फुटबॉलपटूंत छेत्रीला स्थान देत आहे. छेत्रीने मात्र मेस्सी तसेच ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत माझी तुलनाही चुकीची आहे. त्या दोघांचा मी जबरदस्त चाहता आहे, असे सांगितले. मेस्सीने आतापर्यंत 64 गोल केले आहेत. त्यामुळे छेत्रीने तीन गोल केल्यास तो कार्यरत असलेल्या खेळाडूंतील सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत मेस्सीला मागे टाकून दुसरा येऊ शकेल. 

दरम्यान, छेत्री तसेच भारतीय संघाने आपले पूर्ण लक्ष अंतिम लढतीवर केंद्रित केले आहे. भारताने साखळीत केनयास 3-0 हरवले होते. "साखळीतील लढत इतिहास झाला आहे. अंतिम सामन्यातील विजय गृहीत धरणार नाही. त्यांनी सेट पिसेसच्या खेळात आपण प्रभावी ठरतो हे दाखवले आहे,' असे भारतीय मार्गदर्शक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी सांगितले. त्याच वेळी त्यांनी अंतिम लढतीत पूर्ण ताकदनिशी भारतीय संघ उतरणार असल्याचे संकेत दिले. 

Web Title: Intercontinental Cup 2018: Sunil Chhetri may overtake Lionel Messi on goal-scoring list soon