"एफआयएच'चे नव्या वर्षी नवे पाऊल 

वृत्तसंस्था
शनिवार, 24 डिसेंबर 2016

ल्युसाने (स्वित्झर्लंड) - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) नव्या वर्षात नवे पाऊल उचलले असून, विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेसह सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला. 

"एफआयएच'च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या बदलांना मान्यता देण्यात आली असून, हे बदल सर्व स्तरावर नव्या वर्षापासून अमलात येणार आहेत. 

असे आहेत बदल 
नव्या नियमानुसार 2018 पासून होणारी विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा 16 संघांची असेल. त्यांना चार गटांत विभागण्यात येईल आणि गटातील विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचवेळी गटातील अखेरच्या क्रमांकावरील संघ वगळला जाईल. प्रत्येक गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघात सामने होऊन विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. या सामन्यांना "क्रसओव्हर' असे मानले जाईल. या सामन्यातील पराभूत आणि उपांत्यपूर्व फेरीतील पराभूत संघांना वगळले जाईल. ही स्पर्धा सोळा दिवसांची असेल. 

त्याचबरोबर मान्य करण्यात आलेल्या हॉकी नियमात वेळेचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2017 पासून सर्व स्तरातील हॉकी सामने चार सत्रातच खेळविण्यात येतील. यातील प्रत्येक सत्र पंधरा मिनिटांचे करण्यात आले आहे. 

Web Title: International Hockey Federation