Robin Uthappa: उथप्पाचा दुबईमध्ये तांडव! 12 चेंडूत ठोकल्या 52 धावा

उथप्पाने दुबईमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि...
Robin Uthappa
Robin Uthappasakal

Robin Uthappa : गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रॉबिन उथप्पाने दुबईत तांडव घातला आहे. उथप्पाने दुबईमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि 29 चेंडूत अर्धशतकही झळकावले. मात्र, असे असूनही तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

रॉबिन उथप्पा सध्या दुबई कॅपिटल्सकडून आंतरराष्ट्रीय टी-20 लीग खेळत आहे. या लीगमध्ये त्याने आत्तापर्यंत 2 सामने खेळले आहे, आणि दोन्ही सामन्यात बॅटने धुमाकूळ घातला आहे. दुबईकडून खेळण्यापूर्वी त्याने मागील वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा सामना खेळला होता.

Robin Uthappa
Maharashtra Kesari Controversy: ''व्हिडिओ उगाच व्हायरल झाला नाही...; पुन्हा येणार अन्...''

गल्फ जायंट्सविरुद्धच्या सामन्यात रॉबिन उथप्पाने 171च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. यादरम्यान या भारतीय फलंदाजाने 46 चेंडूत 79 धावा ठोकल्या. या सामन्यात त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले आणि फक्त 12 चेंडूत 52 धावा ठोकल्या. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर दुबई कॅपिटल्स आणि गल्फ जायंट्स यांच्यात हा सामना खेळला जात आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटसोबत रॉबिन उथप्पा सलामीला आला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी झाली.

Robin Uthappa
Babar Azam Leaked Video: 'बाबरने मला प्रेग्नेंट केले अन्...' महिलेने पाकिस्तानच्या कर्णधारावर केला गंभीर आरोप

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दुबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात जायंट्सने 19 षटकांत 4 गडी गमावून 183 धावा केल्या. कॅपिटल्सकडून उथप्पाशिवाय कर्णधार रोव्हमन पॉवेलने 38 आणि सिकंदर रझाने नाबाद 30 धावा केल्या. तर कर्णधार जेम्स व्हिन्सने नाबाद 83 धावा केल्या आणि इरास्मसने 52 धावा ठोकून जायंट्स संघाला विजय मिळवून दिला.

Robin Uthappa
Australian Open: गतविजेत्या नदालचा विजयासाठी संघर्ष

बीसीसीआय कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला परदेशी लीगमध्ये खेळू देत नाही. यामुळेच गेल्या वर्षी रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. उथप्पाशिवाय भारताचा युसूफ पठाणही या मोसमात दुबई कॅपिटल्सकडून खेळत आहे. मात्र, आजच्या सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com