धावपटूंवरील कारवाईबाबत ‘आयओए’चे  घूमजाव

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ‘नो निडल पॉलिसी’चा भंग केलेल्या धावपटूंवरील कारवाईस स्पर्धेसाठी नियुक्त केलेल्या भारतीय ऑलिंपिक पदाधिकाऱ्यांनी आव्हान दिले होते. त्या वेळी भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) या कारवाईचे समर्थन केले होते. मात्र, आता आपल्या भूमिकेबाबत घूमजाव करत त्यांनीही या कारवाईस आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. 

राकेश बाबू आणि इरफान यांच्या क्रीडा ग्राममधील खोलीमध्ये इंजेक्‍शनच्या सुया आढळल्या. त्यामुळे या दोघांनाही क्रीडानगरीतून बाहेर काढण्यात आले, तर पथकप्रमुख विक्रम सिसोदिया, व्यवस्थापक नामदेव शिरगावकर आणि ॲथलेटिक्‍स संघव्यवस्थापक रविंदर चौधरी यांना कडक शब्दांत ताकीद दिली होती. त्या वेळी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी वैद्यकीय समितीचा कारवाईचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले होते.

मायदेशी परतल्यावर मात्र मेहता यांनी आज भूमिका बदलली आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अधिकाऱ्यांना ताकीद देणे चुकीचे आहे. संघटना संबंधित धावपटूंची चौकशी करणार आहे. त्याचवेळी राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने आपल्या निर्णयाचा फेरआढावा घ्यावा, या पदाधिकाऱ्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, असे मेहता यांनी पत्रकात म्हटले आहे.

सर्व संघप्रमुख, व्यवस्थापक, मुख्य मार्गदर्शकांना नो निडल पॉलिसीची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली होती. या संदर्भातील बैठकीचे मिनिटस्‌ही सादर करण्यात आले आहेत. नो निडल पॉलिसीची आम्हाला सातत्याने माहिती देत असल्याचे दोन्ही धावपटूंनी चौकशीच्या वेळी सांगितले आहे, याकडेही सिसोदिया यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: IOA action against runners