चेन्नई एक्‍स्प्रेस अंतिम फेरीत

IPL 2018: Super Kings wins
IPL 2018: Super Kings wins

मुंबई - पराभव समोर दिसत असताना निर्णायक क्षणी १३ चेंडूंत ४३ धावांचा पाऊस पाडणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैराबादचा दोन विकेटने पराभव करून आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. वानखेडेच्या याच मैदानात ११८ धावा निर्णायक ठरवणाऱ्या हैदराबादला आज मात्र ही किमया साधता आली नाही.

प्ले ऑफच्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये हैदराबादला १३९ धावाच करता आल्या होत्या; परंतु यंदा चार वेळा कमी धावसंख्येचे यशस्वी संरक्षण त्यांनी केले होते. अखेरच्या तीन षटकांपर्यंत त्यांनी कमालीची पकड मिळवलीही होती; परंतु फाफ डुप्लेसिस आणि शार्दूल ठाकूरने चेन्नई एक्‍स्प्रेस सुसाट पळवली आणि विजयाचे आव्हान पाच चेंडू असतानाच पार केले. शार्दूलने आपल्या अखेरच्या दोन षटकांत १७ आणि २० धावा दिल्या होत्या. याची पुरेपूर भरपाई ५ चेंडूत नाबाद १५ धावा करीत केली. एकीकडे संघाची ७ बाद ९२ अवस्था असताना एक बाजू संयमाने लढवणारा डुप्लेसिस चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

प्ले ऑफच्या या सामन्याची सुरवातच सनसनाटी होती. दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर शिखर धवनच्या यष्टींचा वेध घेतला. केन विलिमसनने याच षटकात तीन चौकार मारून भरपाईही केली. विलिमसन हा त्यांचा सर्वात भरवशाचा फलंदाज. तो पाचव्या षटकात परतला तेव्हा हैदराबादची अवस्था ३ बाद ३६ होती. सतराव्या षटकापर्यंत हैदराबादला सहाचीही सरासरी गाठता आली नव्हती, तर सहा फलंदाज परतले होते. अशा वेळी एकमेव भरवसा असलेल्या ब्राथवेटने शार्दूल ठाकूरला टार्गेट केले. त्याच्या दोन षटकांत चार षटकार मारले. त्याच्या अखेरच्या षटकात २० धावा फटकावल्या, त्यामुळे हैदराबादला १७ षटकांत ६ बाद ९८ वरून २० षटकांत ७ बाद १३९ अशी झेप घेता आली.

संक्षिप्त धावफलक 
हैदराबाद ः ७ बाद १३९ (केन विलिमसन २४ -१५ चेंडूत ४ चौकार, युसुफ पठाण २४ - २९ चेंडूत ३ चौकार, कार्लोस ब्राथवेट नाबाद ४३ - २९ चेंडूत १ चौकार व ४ षटकार, दीपक चहर ३१-१, एन्डिगी २०-१, शार्दूल ठाकूर ५०-१, ब्रावो २५-२) पराभूत वि चेन्नई ः १९.१ षटकांत ८ बाद १४० ( फाफ डुप्लेसिस नाबाद ६७ - ४२ चेंडूत ५ चौकार व ४ षटकांर,  सुरेश रैना २२ - १३ चेंडूत ४ चौकार, संदीप शर्मा ३०-२, सिद्धार्थ कौल ३२-२, रशीद खान ११-२).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com