शेन'गन' धडाडली; चेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद

रविवार, 27 मे 2018

मुंबई - दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना आपणच आयपीएलचे बादशहा असल्याचे आज (रविवार) पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले. सलामीवीर शेन वॉट्सनच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. 

मुंबई - दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना आपणच आयपीएलचे बादशहा असल्याचे आज (रविवार) पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले. सलामीवीर शेन वॉट्सनच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. 

वानखेडे स्टेडियमवर आज (रविवार) होत असलेल्या या हाय व्होल्टेज महामुकाबल्याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने या सामन्यासाठी साहाच्या जागी श्रीवत्स गोस्वामीला संधी दिली. पण, गोस्वामी कमाल दाखवू शकला नाही. तो अवघ्या 5 धावांवर बाद झाला. शिखर धवनच्या साथीला आलेल्या कर्णधार विल्यम्सनने डाव संभाळत अर्धशतकी भागीदारी नोंदविली. मात्र, धवन मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. जडेजाच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात धवन 26 धावांवर त्रिफळाबाद झाला. विल्यम्सनने चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना करत संघाचे शतक झळकाविले. मात्र, तो अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. तो 47 धावांवर कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर यष्टीचीत बाद झाला. शाकीबही त्यापाठोपाठ बाद झाल्याने हैदराबादचा संघ अडचणीत आला. मात्र, फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या युसूफ पठाणने चौकार आणि षटकार खेचक संघासाठी धावा जमाविण्यास सुरवात केली. कार्लोस ब्रेथवेटनेही पठाणला साथ देत संघाचे दीडशतक पूर्ण केले. अखेरच्या षटकांमध्ये या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबाद 178 धावा करू शकला.

या आव्हानासमोर चेन्नईचे सलामीवीर शेन वॉट्सन आणि फाफ डू प्लेसिस यांनी सावध सुरवात केली. भुवनेश्वर कुमार आणि संदीप शर्मा यांच्या गोलंदाजीचा सामना यांनी केला. पण, डू प्लेसिस या सामन्यात कमाल दाखवू शकला नाही. तो अवघ्या 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाने वॉट्सनला साथ देत सुरवातीची षटके खेळून काढत हैदराबादच्या प्रमुख गोलंदाजांचा सामना केला. अखेर वॉट्सनने सिद्धार्थ कौलच्या षटकापासून आपला स्वाभाविक खेळ करण्यास सुरवात केली. त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. रैनानेही 32 धावा करत त्याला साथ दिली आणि शतकी भागीदारी नोंदविली. अखेर वॉट्सनने आपली फटकेबाजी अखेरपर्यंत सुरु ठेवून संघाला विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या 51 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारासह शतक पूर्ण केले. यंदाच्या आयपीलमधील त्याचे हे दुसरे शतक आहे.

Web Title: IPL 2018 third title for Chennai Super Kings

फोटो गॅलरी