IPL 2020 : शुभमन-मॉर्गन रायडर्सनी साकारला कोलकाताचा पहिला विजय!

IPL_KKRvsSRH
IPL_KKRvsSRH

IPL 2020 : KKRvsSRH : अबुधाबी : नव्या दमाचा तडाखेबाज फलंदाज शुभमन गील याची नाबाद अर्धशतकी खेळी (70) आणि मॉर्गनने (42)* त्याला दिलेली उत्तम साथ यांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीचे गडी स्वस्तात आटोपल्यानंतर मनिष पांडेच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादनं 20 षटकात 142 धावा आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने 7 गडी 2 षटके राखून विजय मिळवला.  

आतापर्यंतच्या सात सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले होते. वॉर्नरने यापेक्षा हटके निर्णय घेत प्रतिस्पर्ध्यांसमोर चॅलेंज ठेवण्याचे ठरवले. वॉर्नर-बेअरस्ट्रो जोडीनं संघाच्या डावाला सुरुवात केली. चौथ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कमिंन्सने जॉनी बेअरस्ट्रोला बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. त्याने केवळ 5 धावांची भर घातली. फिरकीपटू चक्रवर्तीच्या षटकात कोलकाताच्या संघाला वॉर्नरच्या रुपात मोठी विकेट मिळाली. त्याने 30 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार खेचत 36 धावा केल्या. तो माघारी फिरल्यानंतर मनिष पांडे (51) आणि वृद्धिमान साहा (30) धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी तंबूत परतल्यानंतर नबी (11) आणि अभिषेक शर्मा 2 यांनी संघाच्या धावफलकावर निर्धारित 20 षटकात 4 बाद 142 धावांपर्यंत पोहचवले. 

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सुनील नरेनला खलील अहमदने खातेही उघडू दिले नाही. धावफलकावर अवघ्या 43 धावा असताना नटराजन याने नितिश राणाला 26 धावांवर माघारी धाडले. हैदराबादचे गोलंदाज लो स्कोअरिंग सामन्याला कलाटणी देऊ शकतात, असे वाटत असताना सलामीवीर शुभमन गीलने संयम दाखवून देत त्यांचे मनसूबे उधळून लावले. त्याने 62 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 70 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूनं इयॉन मॉर्गनने 29 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने त्याला उत्तम साथ दिली. या जोडीच्या संयमी खेळाच्या जोरावर कोलकाताने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.

- क्रीडा क्षेत्रातील अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com