IPL 2020; MIvsRCB नाणेफेक जिंकून रोहित शर्मानं घेतला गोलंदाजीचा निर्णय

Rohit Sharma, Mumbai Indians,Royal Challengers Bangalore, Virat Kohali
Rohit Sharma, Mumbai Indians,Royal Challengers Bangalore, Virat Kohali

दुबई : भारताच्या मर्यादित षटकांच्या प्रकारातील दोन तगड्या फलंदाजांच्या नेतृत्वाखालील संघ दुबईच्या मैदानात आमनेसामने उभे आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळण्याची या दोन महान फलंदाजांमधली पहिलीच लढत आहे. गेल्या सामन्यात पंजाबविरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागलेल्या विराटच्या बंगळूर संघासाठी मुंबई इंडियन्सचे आव्हान सोपे नसणार आहे. मुंबई आणि बंगळूर या दोन्ही संघांनी एक पराभव एक विजय अशी सुरुवात केली असली तरी गेल्या सामन्याचा परिणाम उद्याच्या सामन्यावर होण्याची शक्‍यता आहे. मुंबईने कोलकाता संघाला 49 धावांनी पराभूत केले होते, तर बंगळूरचा संघ पंजाबसमोर 97 धावांनी शरण गेला होता. त्या सामन्यात बंगळूरची गोलंदाजी पूर्णतः निष्प्रभ ठरली होती (अपवाद युझवेंद्र चहलचा), तर फलंदाजीतही विराट-एबी डिव्हिल्यर्ससारखे फलंदाज फ्लॉप ठरले होते. आयपीएलमधील इतिहास मुंबईच्या बाजूने आहेच, आजच्या  सामन्यातही मुंबईचे पारडे जड असेल.

मुंबईचा गेल्या तीन सामन्यांत एकतर्फी विजय
प्रतिस्पर्ध्यातील गेल्या दहा सामन्यात बंगळूरचे दोनच विजय
प्रतिस्पर्ध्यांचा यंदा एक विजय आणि एक पराभव
बंगळूरच्या यापूर्वीच्या दोन्ही लढती दुबईत

विराटच्या कामगिरीवर लक्ष
पंजाबच्या माऱ्यासमोर फलंदाजी करताना विराटला कठीण जात होते, त्यावर सुनील गावसकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ माजला होता. त्या प्रकरणानंतर विराट प्रथमच मैदानात उतरत आहे. दुखावलेला विराट कदाचित तो राग मुंबई गोलंदाजांवर काढतो की संयमावर भर देत संघाच्या गरजेनुसार खेळ करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

बंगळूर वि. मुंबई
आमने-सामने
तपशील बंगळूर मुंबई
विजय     9 - 16
सर्वोत्तम     235-213 
नीचांक     1220-115 

महत्त्वाचे
ठिकाण - दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम
हवामानाचा अंदाज - सामन्याच्यावेळी तपमान 30 अंशापर्यंत अपेक्षित, पावसाची शक्‍यता नाही, मात्र कमालीच्या उकाड्याचे आव्हान. गोलंदाजांना घामामुळे चेंडूवर पकड राखणे अवघड जाण्याची शक्‍यता.
खेळपट्टीचा अंदाज - दुसऱ्या डावात फलंदाजी करताना चेंडू कमी वेगाने येण्याची शक्‍यता. प्रथम फलंदाजीस पसंती अपेक्षित, पण त्याचवेळी दवाचा त्रास सतावण्याचा विचार करून निर्णयावर त्याचा परिणाम. 

लक्षवेधक
मुंबईची गोलंदाजी तसेच फलंदाजी बंगळूरच्या तुलनेत जास्त प्रभावी, तसेच स्थिरावलेली
अपयशी डेल स्टेनऐवजी ख्रिस मॉरिसला बंगळूर संधी देण्याची शक्‍यता
जोश फिलीप पुन्हा अपयशी ठरल्यास बंगळूरची डोकेदुखी वाढणार
एबी डिव्हिल्यर्सला यावेळी तरी ॲरॉन फिंच आणि विराट कोहलीची साथ लाभणार का, हा प्रश्‍न बुमरा, पॅटीनसन आणि ट्रेंट बोल्टसमोर हे आव्हान जास्तच अवघड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com