esakal | IPL 2021: गंभीर झाला मसल पॉवर रसेलचा जबऱ्या फॅन (VIDEO)

बोलून बातमी शोधा

Andre Russell
IPL 2021: गंभीर झाले मसल पॉवर रसेलचे जबऱ्या फॅन (VIDEO)
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021 CSKvsKKR : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलने धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीचा गौतम गंभीर जबऱ्या फॅनच झालाय. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात कोलकाताचा अर्धा संघ अवघ्या 31 धावांवर परतल्यानंतर रसेलच्या जबरदस्त इनिंगने सामन्यात पुन्हा रंगत आली होती. पण अखेरच चेन्नईच्या संघाने 18 धावाने सामना जिंकला. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना धावांची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईकडून फाफ ड्युप्लेसीस आणि ऋतूराज गायकवाड यांनी अर्धशतकी खेळी केली.

ऋतूराज बाद झाल्यानंतर फाफने नाबाद 95 धावांची इनिंग खेळली. त्याच्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला कोलकाताचा डाव चाहरच्या माऱ्यासमोर गांगरला. आघाडीतील पाच फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर रसेल आणि दिनेश कार्तिकने कोलकाताचा डाव सावरला. रसेलच्या इनिंगसंदर्भात गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिलीये. कॅरेबियन खेळाडूने सामना 16 व्या किंवा 17 व्या षटकातच संपवला असता, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: IPL च्या इतिहासातील धोनीच्या चौकाराची 'अनटोल्ड स्टोरी'

'क्रिकबझ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गंभीर म्हणाले की, धोका देऊन त्याला आउट करण्यात आले. चेन्नई सुपर किंग्जने त्याला जी फिल्डिंग लावली होती त्यावरुन सॅम कुरेन त्याला ऑफ स्टम्पवर बॉल टाकणार असे वाटत होते. रसेलने त्यादृष्टीनेच तयारी केली. सॅम कुरेनने आश्चर्यकारकरित्या लेग स्टम्पवर मारा करुन त्याला फसवले. रसेलने त्याचा चेंडू सोडला आणि तो बाद झाला. आंद्रे रसेल ज्याप्रमाणे बॅटिंग करत होता ते कमालीचे होते.

शतकी खेळी करुन त्याने मॅच 16 व्या 17 व्या ओव्हरमध्ये संपवण्याची संधी गमावली. पॅव्हेलियनमध्ये जाताना त्याला याचा पश्चाताप निश्चित झाला असेल, असे गंभीर यांनी म्हटले आहे. वानखेडेच्या मैदानात अशा पद्धतीने खेळणं सोपे नाही, असा उल्लेख करुन गंभीर यांनी केकेआरच्या ताफ्यातील मसल पॉवर रसेलवर कौतुकाचा वर्षाव केला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रसेलने 22 बॉलमध्ये 54 धावांची झंझावत खेळी केली. यात त्याने 3 चौकार आणि 6 सिक्सर खेचले.