esakal | नरेंद्र मोदी स्टेडियवरील राहुलच्या परफॉर्मंसवर जाफरची 'हेराफेरी'

बोलून बातमी शोधा

KL Rahul

नरेंद्र मोदी स्टेडियवरील राहुलच्या परफॉर्मंसवर जाफरची 'हेराफेरी'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021 PBKS vs KKR on Narendra Modi Stadium, Ahmedabad : आयपीएलच्या 14 व्या हंगामात लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knigt Riders) यांच्यात सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर (Narendra Modi Stadium) होणारा हा सामना किती रंगतदार होणार हे सामन्याला सुरुवात झाल्यानंतरच समजेल. मात्र लढतीपूर्वी वासीम जाफर (Wasim Jaffer) यांचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलमधील पहिल्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाचे बॅटिंग कोच वासीम जाफर यांनी मजेदार ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या संघाचा कॅप्टन लोकेश राहुल याच्या परफॉमन्सवर चिंता व्यक्त केलीये.

क्रीडा क्षेत्रातील अन्य बातम्यांसाठी येथे क्लिक करा

यासंदर्भात जाफर यांनी ट्विटच्या माध्यमातून एक मजेदार मिम्स शेअर केलीये. केएल राहुल पुन्हा एकदा नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे. या कॅप्शनसह त्यांनी हेराफेरी चित्रपटातील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा फोटो असणारी मिम्स शेअर केली आहे. या फोटोवर 'मुझे तो ऐसे धक-धक होरेला है' असे लिहिल्याचे दिसते. राहुल नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार असल्यामुळे धकधक वाढलीये, असे जाफर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: अश्विनची IPL मधून माघार, कोरोनामुळे घेतला निर्णय

आयपीएलच्या या लढतीपूर्वी भारतीय संघाने या मैदानात 2 कसोटी आणि 4 टी-20 सामने खेळले होते. टी-20 मध्ये लोकेश राहुलने घोर निराशा रकेली होती. 4 सामन्यात त्याला केवळ 15 धावाच करता आल्या होत्या. या दोन सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील राहुलच्या फ्लॉप शो हा चिंता वाढवणारा आहे, असेच जाफर यांना आपल्या ट्विटमधून म्हणायचे आहे.

पंजाब किंग्जच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर आतापर्यंतच्या 5 सामन्यात त्यांनी दोन विजय नोंदवले आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातील धमाकेदार विजयानंतर पंजाब किंग्जवर सलग 3 सामन्यात पराभूत होण्याची नामुष्की ओढावली होती. गतविजेत्या मुंबई इंडियन्सला नमवून त्यांनी पुन्हा एकदा गुणतालिकेत 'हेराफेरी' करण्याचे संकेत दिले आहेत.