esakal | राशीदचा अफलातून कॅच; मयांक बघतच राहिला (VIDEO)

बोलून बातमी शोधा

PBKS vs SRH
राशीदचा अफलातून कॅच; मयांक बघतच राहिला (VIDEO)
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021 PBKS vs SRH : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील स्पर्धेत पहिला विजय मिळवण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad ) बॉलिंगमध्ये कमालीची कामगिरी केली. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघाला (Punjab Kings) त्यांनी 120 धावांत रोखले. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. पण त्याच्यासह कोणत्याही फलंदाजाला हैदराबादच्या मारा थोपवता आला नाही. लोकेश राहुल स्वस्तात माघारी फिरल्यानंतर मयांक अग्रवालने थोडीफार फटकेबाजी केली. पण खलिदने त्याचा खेळ खल्लास केला. संघाकडून 7 वे आणि आपले वैयक्तीक दुसऱ्या ओव्हरमध्ये खलीलनं मयांकची विकेट घेतली.

हेही वाचा: IPL 2021: हिटमॅनचा सिक्सर पाहून नताशाही झाली शॉक; व्हिडिओ व्हायरल

मयांक अग्रवालची विकेट ही खलील अहमदच्या खात्यात जमा झाली असली तरी या विकेटचे श्रेय हे अफलातून कॅच घेणाऱ्या राशीद खानलाच जाते. त्याने फिल्डिंगचा सर्वोत्तम नमुना दाखवून देत संघाला दुसरे यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. कॅच झाला की नाही असा संभ्रम असल्यामुळे मैदानातील अपार्संनी थर्ड अंपायर्सची मदत घेतली. यावेळी राशीद खान मयांकचा कॅच झालाय हे आत्मविश्वासाने सांगताना दिसले. त्याचा विश्वास सार्थ ठरला आणि थर्ड अंपारने मयांकला बाद केले. मयांक अग्रवालने 25 चेंडूत 22 धावांची खेळी केली यात त्याने 2 चौकारही लगावले. तो बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने पंजाबच्या विकेट पडत राहिल्या. त्याच्याशिवाय शहारुख खानने 22 धावा केल्या. ही पंजाबच्या संघाकडून सर्वोच्च धावसंख्या ठरली.

फिल्डिंगमध्ये कमालीची कामगिरी करुन लक्षवेधून घेणाऱ्या राशीद खानने गोलंदाजीतही चमक दाखवली. त्याने क्रिस गेलसारखा मोठा मासा आपल्या जाळ्यात अडकवला. गेलने 17 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 15 धावा केल्या. राशीद खान याने आपल्या 4 ओव्हर्समध्ये अवघ्या 17 धावा खर्च करुन एक विकेट घेतली. त्याच्या गोलंदाजीतील कामगिरीसह कॅचची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.