esakal | Point Table : चेन्नई अव्वल तर पंजाब तळाशी

बोलून बातमी शोधा

Dhoni

Point Table : चेन्नई अव्वल तर पंजाब तळाशी

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ
  • IPL 2021, Point Table : सहा गुणांसह धोनीचा चेन्नई संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.

IPL 2021, Point Table : मुंबईतील वानखेडे मैदानात बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना झाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार झालेल्या 200 पारच्या लढाईत अखेर चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. रसेल आणि दिनेश कार्तिकने कोलकाताचा डाव सावरल्यानंतर अखेरच्या टप्प्यात पॅट कमिन्सने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. 19 व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर वरुण चक्रवर्ती रन आउट झाला तर शेवटच्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाला रन आउट करत चेन्नईने 18 धावांनी विजय नोंदवला. या विजयासह चेन्नईनं गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. सहा गुणांसह धोनीचा चेन्नई संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.

चेन्नई , बेंगळुरु आणि दिल्ली यांचे समान गुण आहेत. मात्र, चांगल्या रनरेटच्या आधारावर चेन्नईनं अव्वल स्थान तर बेंगळुरुनं दुसरं स्थान काबिज केलं आहे. आरसीबीचा आज, स्पर्धेत चौथा सामना आहे. विजयाचा चौकार लगावत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज करण्याची संधी विराटच्या संघाकडे आहे. आतापर्यंत विराटचा आरसीबी अजय आहे. यंदाच्या हंगामातील पराभव न झालेला एकमेव संघ आहे. दिल्ली तिसऱ्या तर मुंबई चौथ्या स्थानावर विराजमान आहेत.

हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर पंजाबचा संघ तळाशी ढकलला गेलाय. तर हैदराबादच्या संघानं पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

पाहा गुणतालिका