esakal | IPL 2021 : कॅच घेतल्यावर रियान-राहुलनं काढला सेल्फी; नखरेल व्हिडिओ पाहाच

बोलून बातमी शोधा

IPL 2021 : कॅच घेतल्यावर रियान-राहुलनं काढला सेल्फी; नखरेल व्हिडिओ पाहाच
IPL 2021 : कॅच घेतल्यावर रियान-राहुलनं काढला सेल्फी; नखरेल व्हिडिओ पाहाच
sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021, RR vs KKR : राजस्थान रॉयल्सच्या संघाने (Rajasthan Royals ) मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders ) 133 धावांत रोखले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकल्यावर फिल्डिंगचा निर्णय घेतला. संजूच्या सहकाऱ्यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षणाने आपल्या कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवला. कोलकाताच्या दोन गड्यांना राजस्थानच्या संघातील फिल्डर्संनी रन आउटच्या स्वरुपात तंबूत धाडले. तर सहा जण कॅच आउट झाले.

हेही वाचा: IPL 2021 : मॉर्गनने स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला (VIDEO)

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सने मोठा फटका खेळला. यावेळी बाउंड्री लाईनवर रियान परागने याचे झेलमध्ये रुपांतर केले. 6 चेंडूत 10 धावा करुन कमिन्सला माघारी परतावे लागले. रियान परागने त्याचा कॅच पकडल्यानंतर वेगळ्याच अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. कॅच घेतल्यावर खिशातील मोबाईल काढून तो राहुल तेवितियाकडे टाकल्याची नौंटकी त्याने केली. तो इथेच थांबला नाही तर दोघांनी सेल्फी काढत पॅट कमिन्सच्या विकेटचा हटके अंदाजात आनंद साजला केला.

आरआरचे दोन आर म्हणजेच रियान आणि राहुल या खास अंदाजातील सेल्फी मूडचा फोटो आयपीएलच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असून या जोडगोळीची शैली नेटकरी पसंत करत आहेत.