esakal | IPL 2021 : मॉर्गनने स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला (VIDEO)

बोलून बातमी शोधा

RR vs KKR

IPL 2021 : मॉर्गनने स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला (VIDEO)

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021 RR vs KKR, 18th Match : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders ) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील सामन्यात कोलकाताच्या आघाडीने पुन्हा एकदा निराशा केली. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर एका बदलासह मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या संघाने आपल्या नियमित सलामीवीर असलेल्या नितीश राणा आणि शुभमन गिलकरवी डावाला सुरुवात केली.

धावफलकावर अवघ्या 24 धावा असताना शुभमन गिल रन आउट झाला. यातून संघ सावरला नसताना नितिश राणाही माघारी फिरला. उनादकटने सुनील नरेनला माघारी धाडत कोलकाताच्या संघाला अडचणीत आणले. ही विकेट पडल्यानंतर इयॉन मॉर्गन मैदानात उतरला. पण त्याने स्वत: च्या पायावर धोंडा मारण्याचा प्रकार केला. संकटात सापडलेल्या संघाची अडचण आणखी वाढवली. त्याच्या रुपात कोलकाताने दुसरी विकेट रन आउटच्या रुपात फेकली.

हेही वाचा: IPL 2021 : पोलार्डच्या कृतीने मुंबई इंडियन्स बदनाम

11 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर राहुल त्रिपाठी स्ट्राईकवर होता. क्रिस मॉरिसच्या चेंडूवर त्याने समोर फटका खेळला. तो जाऊन इयॉन मॉर्गनच्या बॅटला लागला आणि क्रिस मॉरिसला विकेट मिळवण्याची संधी निर्माण झाली. इयॉन मॉर्गनने धाव घेण्यासाठी क्रिज सोडले होते. त्रिपाठीने रन घेण्यास नकार दिल्यानंतर इयॉन मॉर्गनला धावबाद होऊन परतावे लागले. त्याला खातेही उघडता आले नाही.