MS Dhoni Video IPL 2023: धोनीचा दांडपट्टा झाला सुरू अन् चेन्नईकर झाले सैराट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni Video IPL 2023: धोनीचा दांडपट्टा झाला सुरू अन् चेन्नईकर झाले सैराट

MS Dhoni Video IPL 2023: धोनीचा दांडपट्टा झाला सुरू अन् चेन्नईकर झाले सैराट

IPL 2023 CSK MS Dhoni Video : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाचा थरार येत्या शुक्रवारपासून रंगणार आहे. 31 मार्चला चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या हंगामाची सुरुवात होईल.

या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून सामन्यापूर्वी 4 वेळच्या चॅम्पियन चेन्नईच्या सराव व्हिडिओने धमाल केली आहे. चेपॉकमध्ये महेंद्रसिंग धोनीचा सराव पाहण्यासाठीही हजारो लोक पोहोचत आहेत. फॅन्स त्यांच्या कर्णधाराच्या प्रत्येक शॉटवर जल्लोष करताना दिसत आहेत.

इंडियन प्रीमियर लीगचा 16वा हंगामा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी शेवटचा असल्याचे मानले जात आहे. चेन्नईचा संघ आणि गुजरात यांच्यातील सामन्याने या हंगामाची सुरुवात होणार आहे. चेन्नईमध्ये संघ पहिल्या सामन्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फॉर्ममुळे चाहते आणि संघ दोघांसाठीही आनंदाची बातमी आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा महेंद्रसिंग धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. गेल्या हंगामात संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि संघ 9व्या स्थानावर राहिला. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनी सरावात जोरदार षटकार मारताना दिसत आहे. संघाने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, कर्णधाराने सलग दोन चेंडूंवर षटकार ठोकले, जे पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये खळबळ उडाली.