IPL 2023 Promo Video : आयपीएलच्या प्रोमोमधून धोनी गायब; यंदा हार्दिक, रोहित अन् राहुलचाच जलवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 Promo Video

IPL 2023 Promo Video : आयपीएलच्या प्रोमोमधून धोनी गायब; यंदा हार्दिक, रोहित अन् राहुलचाच जलवा

IPL 2023 Promo : आयपीएलचा 16 वा हंगाम सुरू होण्याला आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. सर्व फ्रेंचायजींची सराव सत्रे, जर्सी अनावरणाची धामधूम दिसत आहे. याचदरम्यान, आयपीएलचे अधिकृत प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने यंदाच्या हंगामाचा पहिला प्रोमो व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला.

या व्हिडिओत गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि लखनौ सुपर जायंट्सचा कर्णदार केएल राहुल देखील दिसत आहेत. या व्हिडिओमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आयपीएल हंगामाबाबतच अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र या व्हिडिओत चेन्नई सुपर किंग्जचा थला महेंद्रसिंह धोनी दिसला नाही. त्यामुळे चेन्नईचे फॅन्स पहिल्या प्रोमो व्हिडिओवर नक्कीच नाराज असतील.

IPL चे अधिकृत प्रसारण हक्क असलेल्या स्टार स्पोर्ट्सने बुधवारी 8 मार्च 2023 रोजी प्रोमो व्हिडिओ प्रसिद्ध केला. प्रोमोमध्ये IPL ची क्रेझ दाखवण्यात आली आहे. ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध करताना, स्टार स्पोर्ट्सने लिहिले, “#IPLonStar परत येत आहे आणि आम्ही शांत राहू शकत नाही! तुमचे मित्र आणि कुटुंबासह एकत्र या, तुमचे टीव्ही चालू करा आणि तुमचा #ShorOn मिळवा, कारण तुमच्या शोरलाच #GameOn मिळतो!

या वर्षी 31 मार्च 2023 रोजी आयपीएलचा 16 वा हंगाम सुरू होईल. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या गुजरात जायंट्सचा मुकाबला एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जशी होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर