IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सला लागली साडेसाती! पंतची जागा करणार होता विकेटकीपिंग पण आता तोही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipl 2023 worry-for-delhi capitals-sarfaraz-khan-injured-in-finger-out-of-irani-cup-rishabh-pant cricket news in marathi

IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सला लागली साडेसाती! पंतची जागा करणार होता विकेटकीपिंग पण आता तोही...

IPL 2023 Delhi Capitals : इंडियन प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात 31 मार्चपासून होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यंदाच्या मोसमात खेळणार नाही. गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस एका कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता.

अशा परिस्थितीत नव्या हंगामापूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र असे असतानाही संघाची अडचण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वीच दिल्लीचा आणखी एक खेळाडू दुखापत झाल्याची बातमी समोर येत आहे.

वृत्तानुसार, यष्टीरक्षक फलंदाज सरफराज खानच्या बोटाला दुखापत झाली आहे. सरफराज अलीकडच्या काळात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि तो इराणी चषक स्पर्धेत शेष भारताकडून खेळणार होता पण दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

सरफराज खानची अलीकडची कामगिरी प्रभावी आहे. रणजी ट्रॉफीच्या या मोसमात त्याने दमदार खेळ केला. त्याने आपल्या संघासाठी 92च्या सरासरीने 556 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने तीन शतके आणि एक अर्धशतकही केले. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्सलाही आशा असेल की तो आयपीएलमध्ये आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवेल आणि संघासाठी जास्तीत जास्त धावा करेल.

आयपीएल 2023च्या आगामी हंगामात सर्फराज खान दिल्ली कॅपिटल्ससाठी विकेटकीपिंगच्या भूमिकेत दिसणार असल्याचे मानले जात आहे. इराणी चषकापूर्वी बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला सुमारे 12 ते 15 दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत फ्रँचायझीने फार काळजी करण्याची गरज नाही. त्याच वेळी दिल्ली कॅपिटल्स संघाने नवीन हंगामाच्या तयारीसाठी त्यांचे प्रशिक्षण शिबिर सुरू केले.