IPL Auction 2021 : अर्जुन पाहतोय मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचे स्वप्न

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 17 February 2021

20 लाख रुपये मूळ किंमतीसह पहिल्यांदाच अर्जुन लिलावात उतरल्यामुळे क्रिकेट वर्तुळात अर्जुन तेंडुलकरलर कोणता  'फ्रँचायजी' बोली लावणार याची उत्सुकता दिसत आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या हंगाम यंदाच्या वर्षी एप्रिलमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मिनी लिलाव प्रक्रिया चेन्नईच्या मैदानात पार पडणार आहे. यात 292 खेळाडूंचा समावेश आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचाही यात समावेश आहे. त्याच्यासाठी कोणता संघ किती रुपये मोजणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. 

20 लाख रुपये मूळ किंमतीसह पहिल्यांदाच अर्जुन लिलावात उतरल्यामुळे क्रिकेट वर्तुळात अर्जुन तेंडुलकरलर कोणता  'फ्रँचायजी' बोली लावणार याची उत्सुकता दिसत आहे. अर्जुनने लिलावापूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला आहे. यात तो मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसतोय. अर्जुन जीममध्ये मुंबई इंडियन्सची जर्सी घालून व्यायाम करताना दिसत आहे.

INDvsENG : जगातील सर्वांत मोठ्या मैदानावर रंगणाऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

लिलावात मुंबई इंडियन्सचा संघच त्याच्यावर बोली लावेल, असा अंदाज यापूर्वीही वर्तवण्यात आला होता. अंतिम यादीत अर्जुन तेंडुलकरचे नाव समाविष्ट झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तो मुंबईच्या संघात खेळेल असा अंदाज वर्तवला होता. युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत अर्जुन मुंबई इंडियन्सच्या संघासोबत नेट बॉलर म्हणून सोबत होता. त्यावेळीपासूनच भविष्यात तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसेल असे बोलले जात आहे. 

May be an image of one or more people and text

लिलावापूर्वी जलदगती डावखुऱ्या गोलंदाजाने फलंदाजीत धमाका केल्याचे पाहायला मिळाले होते. 73 व्या पोलिस शील्ड स्पर्धेत अर्जुनने 23 चेंडूत 47 धावांची खेळी केली होती. यात त्याने 5 षटकार लगावले होते. अर्जुन तेंडुलकर अष्टपैलू म्हणून खेळतो. 21 वर्षीय खेळाडूने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून मुंबईच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीतून त्याला संधी देण्यात आली नव्हती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ipl auction 2021 Arjun tendulkar waring mumbai indians jersey and share Photo ahead of ipl mini auction