IPL : बंगळूरच्या आशा कायम

राजस्थान रॉयल्सचा ११२ धावांनी धुव्वा
ipl
iplsakal

जयपूर - फाफ ड्युप्लेसीच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाने रविवारी राजस्थान रॉयल्सचा ११२ धावांनी धुव्वा उडवला आणि आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम राखले. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा हा सहावा विजय ठरला.

राजस्थान रॉयल्सला मात्र सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थान रॉयल्सला आता एक सामना बाकी असून त्यांचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. फाफ ड्युप्लेसी व ग्लेन मॅक्सवेलची दमदार अर्धशतकी खेळी आणि वेन पार्नेल, मायकेल ब्रेसवेल व कर्ण शर्मा यांची प्रभावी गोलंदाजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली.

ipl
Sangli Crime: क्रूरतेचा कळस! अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाला फेकलं विहिरीत

बंगळूरकडून मिळालेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही.

मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात फॉर्ममध्ये असलेल्या यशस्वी जयस्वाल याला शून्यावरच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचा झेल विराट कोहलीने टिपला. त्यानंतर वेन पार्नेल याने जॉस बटलर (०) व संजू सॅमसन (४ धावा) यांना झटपट बाद करीत राजस्थानची अवस्था ३ बाद ७ धावा अशी केली.

या धक्क्यातून राजस्थानचा संघ सावरलाच नाही. शिमरॉन हेटमायर याने १९ चेंडूंमध्ये ३५ धावांची खेळी केली. राजस्थानचा डाव १०.३ षटकांत ५९ धावांमध्येच गडगडला. पार्नेल याने १० धावा देत ३ फलंदाजांना तंबूत पाठवले. मायकेल ब्रेसवेल व कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

ipl
Pune : मार्केट यार्डात चोरी करताना 'तो' सी सी टीव्हीत दिसला अन्.. पुढे काय झालं ?

नीचांकी धावसंख्या

राजस्थानचा संघ या लढतीत ५९ धावांवर गारद झाला. आयपीएलच्या इतिहासातील ही तिसरी नीचांकी धावसंख्या ठरली. याआधी कोलकताने २०१७मध्ये बंगळूरला ४९ धावांवर बाद केले होते. तसेच बंगळूरने २००९मध्ये राजस्थानला ५८ धावांवर बाद केले होते.

तसेच बंगळूरने रविवारच्या लढतीत ११२ धावांनी विजय साकारला. आयपीएलच्या इतिहासात दहाव्यांदा १०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी विजय मिळवता आला आहे.

संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर २० षटकांत ५ बाद १७१ धावा (फाफ ड्युप्लेसी ५५, ग्लेन मॅक्सवेल ५४, अनूज रावत नाबाद २९, ॲडम झाम्पा २/२५) विजयी वि. राजस्थान रॉयल्स १०.३ षटकांत सर्व बाद ५९ धावा (शिमरॉन हेटमायर ३५, वेन पार्नेल ३/१०, मायकेल ब्रेसवेल २/१६, कर्ण शर्मा २/१९).

ipl
Pune : ओतूर पोलीसांनी शेती मोटारीच्या केबल चोरांच्या मुसक्या आवळल्या

धडाकेबाज फलंदाजी

फाफ ड्युप्लेसी व विराट कोहली या जोडीने ५० धावांची आश्‍वासक भागीदारी केली. के. आसिफच्या गोलंदाजीवर विराट १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर ड्युप्लेसी व ग्लेन मॅक्सवेल या जोडीने ६९ धावांची भागीदारी करताना धावांचा ओघ कमी होऊ दिला नाही.

असिफनेच ड्युप्लेसीला ५५ धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. मॅक्सवेल ३३ चेंडूंमध्ये ५४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार व ३ षटकार मारले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com